zendu phool.jpg 
नाशिक

लॉकडाउनमध्ये 'ते' मिळवताय फुल विक्रीतून दररोज वीस हजार रुपये?...कसं ते वाचा

सकाळवृत्तसेवा

नाशिक / दिक्षी : 'हे तर लय बेस हाय'...लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागला हे तर जग जाहीर आहे, मात्र याच कोरोनाच्या महामारीत झेंडूची फुलं सोन्याची अंडी बनून उत्पादकाच्या मदतीला धावून आल्याने त्यांना वीस हजार रूपये रोज मिळत आहेत...ते कसे? चला जाणून घेऊयात... 

शेतीमध्ये विविध प्रयोग 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागला. मात्र निफाड तालुक्‍यातील दिक्षी येथील अजय चौधरी या युवा शेतकऱ्याने या संकटाला आव्हान देत पाच एकर झेंडूमध्ये खरबूज, टरबूज हे आंतरपीक घेतले आहे. लॉकडाउनच्या काळामध्येही त्यांनी तीन दिवसांत तीन हजार किलो झेंडूच्या फुलांची 20 रुपये किलोप्रमाणे विक्री केली आहे. म्हणजेच प्रतिदिन एक हजार किलो फुलांच्या माध्यमातून त्यांना 20 हजार रुपये रोज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अजय चौधरी आणि ज्ञानेश्‍वर चौधरी हे दोघे भाऊ आपल्या मालकीच्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेती करतात. सध्या त्यांच्याकडे डाळिंबाची बाग आहे.

लॉकडाउनमध्येही चांगला आधार

पाच एकर जमिनीवर त्यांनी झेंडूची लागवड केली आहे. झेंडूच्या फुलांनी त्यांना लॉकडाउनमध्येही चांगला आधार दिला. बहुपीक शेतीच गरजेची मुंबई येथे झेंडूच्या फुलांची विक्री करून आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र चौधरी यांनी नैसर्गिक आपत्ती येणारच म्हणून बहुपीक पद्धतीचा वापर सुरू केला. 

नैसर्गिक आपत्ती येणारच म्हणून...

एखादे पीक खराब झाले तर दुसरे पीक आधार देईल. प्रत्येक वेळी शासनाच्या तुटपुंज्या मदतीकडे डोळे लावून बसणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे चौधरी यांनी पाच एकर फुलांच्या बागेत खरबुजाची 18 हजार, तर टरबुजांच्या तीन हजार रोपांची लागवड केली. फुलांमधून उत्पन्न सुरू असून, पुढे खरबूज आणि टरबूज काढणीला येणार आहेत. सध्या किरकोळ बाजारात 20 रुपये किलोप्रमाणे खरबूज आणि टरबुजांची विक्री होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांनीही एकाच खर्चिक पिकामागे न लागता बहुपीक शेती करण्याचे आवाहन चौधरी यांनी केले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT