Mahajyoti esakal
नाशिक

Mahajyoti : ‘महाज्‍योती’ च्या प्रशिक्षणासाठी जुलै-ऑगस्‍टमध्ये परीक्षा; वेळापत्रक प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

Mahajyoti : महात्‍मा ज्‍योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्‍योती) तर्फे दिल्‍या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांकरिता उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्‍यानुसार या परीक्षा जुलै व ऑगस्‍ट या महिन्‍यात टप्‍याटप्‍याने पार पडणार आहेत. निकषांनुसार पात्र ठरलेल्‍या उमेदवारांना परीक्षेला सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे. (Examination in July August for training of Mahajyoti Schedule released nashik news)

राज्‍य शासनाच्‍या इतर मागासवर्ग व बहुजन कल्‍याण विभागाअंतर्गत महाज्‍योती ही संस्‍था कार्यरत आहे. या संस्‍थेमार्फत भटक्‍या जाती-विमुक्‍त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना विविध स्‍पर्धा परीक्षा, भरती परीक्षांकरिता मार्गदर्शन सुविधा उपलब्‍ध करून दिलेली आहे.

या प्रशिक्षण योजनांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांतून कागदपत्रे तपासणी केल्‍यानंतर छाननी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी निश्‍चित करण्यात आले आहे. या पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून छाननी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे.

त्‍याअनुषंगाने परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. साधारणतः परीक्षेच्‍या तारखेच्‍या दहा दिवस पूर्वी संकेतस्‍थळावर प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत.

कुठल्‍याही उमेदवाराला वैयक्‍तिक पातळीवर प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिल्‍याबाबत कळविले जाणार नाही. त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्‍थळाला भेट देताना परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, अशा सूचना महाज्‍योतीतर्फे देण्यात आल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहे परीक्षांचे वेळापत्रक-

(परीक्षा संगणकावर आधारित घेतल्‍या जातील)

* सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षण परीक्षा----९ जुलै

* यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा---१६ जुलै

* एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा---३० जुलै

* गट-ब, क (एमपीएससी) पूर्व प्रशिक्षण-------१३ ऑगस्‍ट

* एमबीए-कॅट, सीमॅट-सीईटी पूर्व प्रशिक्षण-----२७ ऑगस्‍ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT