Exam
Exam esakal
नाशिक

Examination Rules : दहावी, बारावीच्‍या परीक्षेत वेळेआधी मिळणार नाही प्रश्‍नपत्रिका; हे आहेत बदल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोशल मिडीयावर पसरणाऱ्या अफवा तसेच पेपर फुटीसारखे प्रकार लक्षात घेता आता यावर्षीच्‍या दहावी, बारावीच्‍या परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षेच्‍या निर्धारित वेळेवर प्रश्‍नपत्रिका वितरित केली जाणार आहे.

यापूर्वी परीक्षा वेळेच्या दहा मिनिटे पूर्ण प्रश्‍नपत्रिका वितरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. (Examination Rules question paper will not received before time in SSC HSC examination nashik news)

या संदर्भात शिक्षण मंडळाने आदेश जारी केले आहे. त्‍यानुसार इयत्ता दहावी, बारावीच्‍या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्‍नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्‍या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनीटे अगोदर करण्यात येत होते.

परंतु प्रश्‍नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्‍य समाज माध्यमातून व्‍हायरल झाल्‍याच्‍या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्‍या आहेत. दहावी, बारावीच्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा महत्त्वाचा टप्पा असतात.

पेपरफुटीच्‍या अफवांमुळे विद्यार्थ्यांच्‍या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा निर्धारित वेळेनंतर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेचा आशय आढळून आल्‍याच्‍या घटना निदर्शनास आलेल्‍या आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या घटनांना प्रतिबंध करताना परीक्षा सुरळीतपद्धतीने पार पडाव्‍यात, यासाठी परीक्षेच्‍या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी -मार्च २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे.

अर्धा तास आधी उपस्‍थित राहण्याच्या सूचना

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्‍या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात पोहोचावे. सकाळ सत्रात सकाळी साडेदहाला तसेच दुपार सत्रात दुपारी अडीचला परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याने उपस्‍थित राहाणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकाचे वितरण अनुक्रमे सकाळी अकरा आणि दुपारी तीनला केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT