Nashik ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Nashik : कार्यकारी अभियंता कंकरेज अखेर सक्तीच्या रजेवर; ZP CEOनी काढले आदेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पालकमंत्री दादा भुसेंनी घेतलेल्या आढावा बैठकीत बांधकाम विभाग एकचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी कंकरेज यांचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कंकरेज यांनी मंगळवारी (ता.१५) सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पुढील आदेश होईपर्यंत कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांचा कार्यभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्याकडे सोपविला आहे. (Executive Engineer Kankerage finally on forced leave Orders issued by ZP CEO Nashik News)

श्री. कंकरेज यांच्यामुळे कामे रद्द झाल्याचा आरोप करत आमदार खोसकर व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली. आमदार कांदे कंकरेज यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

पालकमंत्री भुसे यांच्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीतही आमदार खोसकर यांनी उपस्थितीत राहत हा मुद्दा उपस्थित करत कंकरेज यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या विरोधात तक्रारी मांडत, त्यांच्यावर तत्काळ करवाई करण्याची मागणी त्यांनी केल होती. पालकमंत्री भुसेंनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत कंकरेज यांच्या कारभाराचा यापूर्वीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत.

नव्याने त्यांची चौकशी करून त्यांचा कारभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी कंकरेज यांचा अहवाल तयार करण्यात आला. मंगळवारी थेट कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश काढण्यात आले.

"कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. त्यांचा तक्रारींवर शासनाला अहवाल पाठविण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांचा कार्यभार कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT