नाशिक : नुकतेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सूर्यग्रहणाची अनुभूती घेतल्यानंतर आता खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. मंगळवारी (ता. ८) खंडग्रास चंद्रग्रहणाची अनुभूती घेता येईल. ग्रहण काळात सायंकाळी सहा वाजून १९ मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळण्याचा सल्ला धर्मशास्त्रातील अभ्यासकांनी दिलेला आहे.
कार्तिक शुक्ल पौर्णिमेला मंगळवारी (ता. ८) खग्रास चंद्रग्रहण आहे. संपूर्ण भारतात ग्रहण दिसणार असले तरी महाराष्ट्रात मात्र खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. चंद्रोदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ असेल.
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे मंगळवारच्या सूर्योदयापासून मोक्षाच्या वेळेपर्यंत ग्रहणाचे वेध पाळण्याचा सल्ला धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला आहे. दरम्यान बालके, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्तींसह गर्भवती महिलांनी सकाळी अकरापासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळण्याचा सल्ला दिलेला आहे. वेधामध्ये भोजन टाळावे. स्नान, जप, देवपूजा करण्यासह दैनंदिन कृती करता येतील. ग्रहण पर्वकाळात ग्रहण स्पर्श ते सूर्यास्तदरम्यान विशेष काळजी घेण्याचा व मोक्षानंतर स्नानाचा सल्ला दिला आहे. (Experience Lunar Eclipse on Tuesday Advice to observe eclipse till 6:30 in evening Nashik News)
महत्त्वाचे टप्पे-
- ग्रहणाचा स्पर्श- दुपारी दोन वाजून ३९ मिनीटे.
- ग्रहण मध्य- दुपारी चार वाजून ३० मिनीटे.
- ग्रहण मोक्ष- दुपारी चार वाजून १९ मिनीटे.
राशीनिहाय प्रभाव-
ग्रहणाचा मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफल असेल. तर सिंह, तूळ, धनू, मीन या राशींना मित्रफल असेल. मेष, वृषभ, कन्या व मकर राशींना अनिष्ट फल असून या राशीच्या व्यक्ती व गरोदर महिलांनी ग्रहण पाहणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
उघड्या डोळ्यांनी
पाहता येईल ग्रहण
ग्रहण ही खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरत असते. निसर्गाची अनोखी अनुभूती घेण्यासाठी खगोलप्रेमींची धडपड बघायला मिळते. आगामी चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. पूर्व दिशेला क्षीतिज दिसेल या पद्धतीने किंवा इमारतीच्या गच्चीवर उंच ठिकाणाहून या खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार आहे. दुर्बिणीचा आधार ग्रहण पाहाण्यासाठी घेता येऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.