Experimental Woman Farmer Manisha Ingle flourished organic farming  Laboratory soygaon nashik news
Experimental Woman Farmer Manisha Ingle flourished organic farming Laboratory soygaon nashik news esakal
नाशिक

Womens Day Special : ‘ति’ने जिद्दीने फुलवली सेंद्रिय शेती!

योगेश बच्छाव

सोयगाव (जि. नाशिक) : शेतीकडे (Farming) पाहण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनात आता बदल होत असल्याचे गावाकडील काही उदाहरणांमधून सहज बघायला मिळते.

शेतीसंस्कृतीत पारंपारिकदृष्ट्या घरातील पुरुष हा कर्ता आणि निर्णयक्षम समजला जायचा. (Experimental Woman Farmer Manisha Ingle flourished organic farming Laboratory soygaon nashik news)

या दृष्टीकोनाला छेद देत काही कर्तबगार महिलांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवलाय. साकुरी निंबायती (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील महिला शेतकरी मनिषा सुभाष इंगळे यांनी जमीन सुपीकता, दर्जेदार फळ, भाजीपाला उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.

शिफारशीत प्रमाणात सेंद्रिय खते, कीटकनाशकांचा वापर करत त्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्यास सुरवात केली. शिवाय, गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करत शेती विकासाची दिशा दाखविली आहे.

मनीषा इंगळे यांच्या कुटुंबाची साकुरी निंबायती शिवारात ४.५ एकर शेती आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांनी पती सुभाष यांच्यासोबत शेती व्यवस्थापनाला नवी दिशा दिली. २०१५ पर्यंत संपूर्ण क्षेत्रावर डाळिंब लागवड होती. मात्र, तेलकट डाग रोगामुळे २५ टन फळे तोडून फेकावी लागली. या संकटावर मात करत त्या पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिल्या.

परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर दिला. मागील दोन ते तीन वर्षांत डाळिंब क्षेत्र कमी करून भाजीपाला, हंगामी फळपिके घेण्यास सुरवात केली.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

पाच वर्षांपासून रासायनिक खतांचा टप्याटप्याने वापर कमी करत सेंद्रिय खते, कीडनाशक वापरावर भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेण-गोमूत्र, स्टी, जिवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क स्वतः तयार करून त्याचा वापर सुरू केला. गेल्या चार वर्षापासून पीक उत्पादन गुणवत्ता वाढल्याने दरही चांगला मिळत आहे.

एप्रिलमध्ये कांदा काढल्यानंतर गवार, भेंडी, गिलके, दोडके, मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर लागवड केली जाते. शिवाय, उपलब्ध क्षेत्रानुसार पपई व टरबुज लागवड असते. उत्पादनाला चांगली चव, दर्जा असल्याने ग्राहकांची वाढती मागणी असते. शेणस्लरी आदी सेंद्रिय खतांच्या उत्पादनासाठी त्यांनी देशी गायीचे संगोपन केले आहे. संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन केले आहे.

अभ्यासूवृत्तीमुळे शेतीमध्ये बदल

मनीषाताई गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादन, बाजारपेठ व विक्री व्यवस्थापनाचा सातत्याने अभ्यास करतात. यू-ट्यूबवरील शेतीविषयक माहिती, तसेच ‘ॲग्रोवन’मधील लेख, यशोगाथांचा अभ्यास करून प्रत्यक्ष शेतीत अवलंब करतात. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अजंग वडेल (ता. मालेगाव) येथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेती व्यवस्थापन सुधारणा करीत असतात.

नाशिक येथे बँक ऑफ महाराष्ट्र संचलित ‘आरसोटी’ येथे मसाले उत्पादन, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. सध्या त्या उमेद अभियानाच्या प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

महिला शेतकरी गटाची स्थापना

गावातील महिला शेतकऱ्यांना संघटित करून रसायन अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादन करण्याच्या हेतूने एप्रिल २०२२ मध्ये मनीषाताईंनी श्री गणेश सेंद्रिय महिला शेतकरी गटाची स्थापना केली. गटातील पंधरा सदस्यांनी विविध भाजीपाला पिकांची लागवड करून आतापर्यंत २०० कुटुंबांना भाजीपाला पोचवला आहे.

सदस्यांचा गटामार्फत जीवन विमा उतरविला आहे. सदस्यांना पोकरा, महाडीबीटी पोर्टलवरून ठिबक सिंचन, कांदा चाळ, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला असून, शासनाच्या विविध अनुदानित योजनांसाठीही त्या प्रयत्नशील आहेत. महसूल विभागाच्या ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेंतर्गत १७ महिलांची सहहिस्सेदार म्हणून नावे लावली आहेत.

"शेतीकडे महिलांनी वळायला हवे. महिलांनी ध्यास घेतल्यास प्रयोग सहज साकारता येतो. शासन, कृषी विभागाचे सहकार्य तर मिळतेच; आम्हीसुद्धा अप्राधान्य निर्माते आहोत, याचा अभिमान वाटतो. सेंद्रिय प्रयोगशाळा निर्मितीसाठी सर्व महिलांनी पुढाकार घेत ही प्रयोगशाळा साकारली." -मनीषा इंगळे, प्रयोगशील महिला शेतकरी, साकुरी (नि.), मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT