Monkey while carrying expired medicines and injection stock esakal
नाशिक

Nashik News: कसारा घाटात मुदतबाह्य औषधे-इंजेक्शन! आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ असलेल्या घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीच्या बाजूला अज्ञाताने मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे व इंजेक्शन देण्यासाठी वापरणारे सिरींज, कापूस आदींचा साठा सोमवारी (ता. २४) टाकलेला मिळून आला.

या प्रकारामुळे वन्यजीवांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Expired drugs injection in Kasara Ghat Fear of developing health problems Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उंटदरीत सहवास करणारी माकडे हे औषधे खात असून, सिरींज घेऊन जात असल्याने मोठा अनर्थ घडून माकडांना इजा होऊ शकते. तसेच, उंटदरीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

तसेच, औषधे फेकलेल्या ठिकाणापासूनच जवळ अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. या धबधब्यांचे पाणी पुढे भातसा नदीच्या पाण्याला जाऊन मिळते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे. राज्यभरातून पावसाळ्यात वीकेंडला हजारो पर्यटक येतात.

पर्यटकांच्या मुख्य ठिकाणीच असे कृत्य कोणी केले, याचा तपास त्वरित होणे अपेक्षित आहे. तसेच, वन्य प्राण्यांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वन विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT