D. Pharmacy Admission esakal
नाशिक

D Pharmacy Admission : डी.फार्मसीच्‍या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या कॅप राउंडचे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

D Pharmacy Admission : इयत्ता बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम डी. फार्मसीच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत नोंदणी करता येईल.

प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले असून, त्‍यानुसार ५ ऑगस्‍टला पहिल्‍या फेरीची वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Extension for Registration of D Pharmacy till 24th July nashik news)

गेल्‍या १२ जूनपासून डी. फार्मसीच्‍या नोंदणीला सुरवात झालेली आहे. यापूर्वी वाढीव मुदत काल (ता.१०) संपत असताना पुन्‍हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना येत्‍या २४ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल.

याच मुदतीत ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी पर्यायांची निवड करून कागदपत्रे पडताळणी करून घ्यायची आहेत. प्रवेशाच्‍या पुढील टप्यांत २६ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, हरकत किंवा तक्रार नोंदविण्यासाठी २७ ते २९ जुलैदरम्‍यान मुदत दिली जाईल. ३१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केले जाणार असून, यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया पार पडेल. एकूण तीन कॅप राउंडच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कॅप राउंडचे वेळापत्रक असे-

* पहिल्‍या कॅप राउंडसाठी ऑप्‍शन फॉर्मची मुदत-----१ ते ३ ऑगस्‍ट

* या फेरीसाठी निवड यादीची प्रसिद्धी----------------५ ऑगस्‍ट

* विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची मुदत---------------६ ते ९ ऑगस्‍ट

* दुसऱ्या कॅप राउंडसाठी ऑप्शन फॉर्मची मुदत-------१२ ते १६ ऑगस्‍ट

* या फेरीसाठी निवड यादीची प्रसिद्धी----------------१८ ऑगस्‍ट

* विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी मुदत-----------१९ ते २२ ऑगस्‍ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT