Rajya Natya Spardha esakal
नाशिक

Rajya Natya Spradha: राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spradha : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्य संस्थांकडून २१ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी (ता. १५) प्रवेशिका सादर करण्यासाठी अंतिम मुदत होती. मात्र स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी शुक्रवारी (ता. २२) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of deadline for entry of State Drama Competition nashik)

हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध १९ स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था, गतवर्षी राज्य नाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या mahanatyaspardha.com या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध होतील.

आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका मुदतीत ऑनलाइन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोशागारात जमा करण्यात येईल.

नाट्य स्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. असे पत्रात नमूद करण्यात आले असून मुदतवाढ दिल्याची नोंद हौशी रंगकर्मींनी घ्यावी असे आवाहन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार; दिल्लीत घडामोडींना वेग, DK शिवकुमारांच्या गळ्यात CM पदाची माळ?

Video: युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात, आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

Nashik Municipal Election : नाशिक पालिका निवडणुकीचा रणसंग्राम! ११ नगराध्यक्षपदांसाठी ५३ उमेदवार; मतविभागणीमुळे यशापयशाची गणिते विसंबून

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये मतदार याद्यांवर नागरिकांच्या हरकती

SCROLL FOR NEXT