ST Smart Card latest news
ST Smart Card latest news esakal
नाशिक

‘MSRTC Smart Card’ नूतनीकरणाला मुदतवाढ; ज्येष्ठांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड नूतनीकरणासाठी ३१ ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढविल्याने बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्मार्ट कार्ड देणारी यंत्रणा हळूवार चालत असल्याने नूतनीकरण केलेले स्मार्टकार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत.

तासन्‌तास रांगेत उभे राहूनही स्मार्ट कार्ड मिळत नसल्याने ज्येष्ठांचे हाल होत आहेत. आता एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड नूतनीकरणाची मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर ही मुदत ३१ ऑगस्ट अशी होती. (Extension of MSRTC Smart Card Renewal Relief for seniors jalgaon latest marathi news)

जिल्ह्यात परिवहन महामंडळाचे ११ आगार आहेत. या आगारातून लांबपल्ल्याच्या तसेच ग्रामीण स्तरावर हजारो फेऱ्या होतात. एसटी बसच्या माध्यमातून विद्यार्थी पासेस, ज्येष्ठ नागरिक, प्रसार माध्यम प्रतिनिधी, आमदार, खासदार लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग अशा सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते.

त्यासाठी सवलतधारकांना परिवहन महामंडळातर्फे स्मार्टकार्ड देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे ७५ हजार ९१६ स्मार्टकार्डसाठी नोंदणी आहे. त्यापैकी परिवहन विभागास ७० हजार ३३१ कार्ड प्राप्त झाले आहेत. तर ५६ हजाराहून अधिक कार्ड वितरण लाभार्थींनी देण्यात आले आहेत.

यापैकी स्मार्टकार्ड नूतनीकरणासाठी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सर्व्हर तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक सवलतधारकांचे स्मार्टकार्ड नुतनीकरण झालेले नाही. आगामी सण-उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसह या स्मार्टकार्डधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणी व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

"जिल्ह्यात प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना आधार क्रमांकाशी निगडित स्मार्टकार्ड सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना कार्ड वितरण नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. संसर्ग प्रतिबंधात्मक काळासह एसटीच्या संपादरम्यान अनेक लाभार्थीना स्मार्ट कार्ड नोंदणी वा कार्ड घेणे शक्य झाले नव्हते. आता ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे." - भगवान जगनोर,, एस.टी.विभाग नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT