Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : नगरसेविका पुत्राकडून उकळली खंडणी; 5 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजपच्या महिला नगरसेविका इंदुमती नागरे याचे पुत्र व ठेकेदार विक्रम नागरे यांच्याकडून खंडणी उकळून ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात भाजप मंडळ अध्यक्षांचा भाऊ रोशन काकड, संजय जाधव यांच्यासह अन्य पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. (Extortion extorted from bjp corporator indumati nagare son case registered against 5 persons Nashik Latest Crime News)

सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले, की ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान भाजप पदाधिकारी व नगरसेविका इंदुमती नागरे याचे पुत्र व कामगार ठेकेदार विक्रम नागरे पिंपळगाव बहुला येथील वडिलोपार्जित जमिनीकडे जात असताना वाटेतच भाजप मंडळ अध्यक्ष काकड यांचे बंधू रोशन काकड, दीपक भालेराव, संजय जाधव, गणेश अशोक लहाने, गौरव गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे, जया दिवे आदीसह अन्य संशयितांनी नागरे याची गाडी अडवून पाच लाखाची खंडणी मागितली. तसेच मोबाईलद्वारे वेळोवेळी ठार करण्याची धमकी दिली. ३० ऑक्टोबरला नागरे कामानिमित्त बेळगावला गेले असता, रात्री निवासस्थानी येऊन संशयितानी नागरे यांना शिवीगाळ करत बॅनर फाडले व दारूच्या बाटल्या फोडून घरावर दगडफेक केली.

याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देत नागरे यांनी २ नोव्हेंबरला सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख व सातपूरचे वरीष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम युनिट तपास करत आहे. यात दोन संशयितांना अटक झाली.

दुसरीकडे विक्रम नागरे आमच्या गुन्हेगारीचा उपयोग करून औद्योगिक क्षेत्रात युनियन, ठेकेदारीसह इतर अवैद्य धंदावर बस्तान बसवून कोट्यवधीची माया कमावली आहे. अडीअडचणीला पैसे मागितले, तर खोटे गुन्हे दाखल करून अटकवत असल्याचा आरोप संशयितांच्या नातेवाइकांनी केला आहे.

अजून काही साथीदार रडारवर

विक्रम नागरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यापूर्वीच्या ठेकेदारीवरून औद्योगिक वसाहतीत वाद झाले आहेत. त्यात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या संशयितांनी त्यांच्या साथीदार अमोल हिगेवरच हल्ला झाल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले होते. तसेच साथीदार जितू भागंरे याच्यावरही अंबड औद्योगिक वसाहतीत हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अजून काही साथीदार रडारवर असल्याची चर्चा आहे.

संशयितांविरुद्ध खून, दरोडा, खंडणीसह इतर गुन्हे दाखल

रोशन हरिदास काकड : ३०२, ३६३

संजय जाधव : ३०२

दीपक भास्कर भालेराव : ३०२, ३६३

अनिरुद्ध शिंदे : ३०२

जया दिवे : २९६

(वरील सर्व संशयित जामिनावर बाहेर आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT