corona hospital.jpg
corona hospital.jpg 
नाशिक

कोरोना रुग्णांकडून आकारले जाताएत अव्वाच्या सव्वा दर.. 'या' हॉस्पिटलला मनपाची नोटीस 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांना दर निश्‍चित करून दिले आहेत. याबाबत वारंवार आवाहन करूनही काही रुग्णालये याबाबत दक्षता घेत नसल्याने रुग्णालयांची तपासणी सुरू केल्याची माहिती डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. 

काय घडले नेमके?

कोरोना रुग्णांमधील भीतीचा फायदा घेत शहरातील खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जात आहे. यावर शिवसेनेने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका प्रशासनाने 22 लेखापरीक्षक व भरारी पथकांची नियुक्ती करून तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर तक्रारीसाठी हेल्पलाइन जाहीर केल्यानंतर त्यावर तक्रारी प्राप्त होत आहेत. नाशिक-पुणे महामार्गावरील पायोनियर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. रुग्णालयाकडून एका पीपीई किटची किंमत पाचशे रुपये असताना एक दिवसासाठी दहा हजार 500 रुपये आकारण्यात आले. दहा दिवसांच्या उपचाराचे कन्सल्टिंग चार्जेस लावणे अपेक्षित असताना पंधरा दिवसांचे लावले.

हॉस्पिटलला मनपाची नोटीस

त्यामुळे तक्रारीनुसार तपासणी केली असता घाबरलेल्या रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रे सादर केली नाहीत. शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करताना दरसूची निश्‍चित केलेली असतानाही त्यापेक्षा अधिक दर आकारणी केल्याने अशोका मार्गावरील पायोनियर हॉस्पिटलला महापालिकेकडून मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.. शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांना दर निश्‍चित करून दिले आहेत. याबाबत वारंवार आवाहन करूनही काही रुग्णालये याबाबत दक्षता घेत नसल्याने रुग्णालयांची तपासणी सुरू केल्याची माहिती डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. 

दर्शनी भागावर दरफलक 
रुग्णांना शासनाच्या दराची माहिती व्हावी म्हणून दर्शनी भागावर दरफलक लावण्याचे आवाहन रुग्णालयांना करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने महापालिकेतर्फे फलक लावण्यास सुरवात झाली आहे. वोक्‍हार्ट रुग्णालयाच्या दर्शनी भागावर शनिवारी (ता. 4) दरफलक लावण्यात आला. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT