Eye examination camp at Pravara Education Institute on the occasion of Engineering Day esakal
नाशिक

Nashik : अभियांत्रिकी दिनानिमित्त प्रवरा शिक्षण संस्थेत नेत्र तपासणी शिबिर

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : अभियांत्रिकी दिनानिमित्त लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरैय्या इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचोली, नाशिक येथे सिंधुताई विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, चिंचोली (सिन्नर), नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबीरातून ८७५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. (Eye examination camp at Pravara Education Institute on occasion of Engineering Day Nashik Latest Marathi News)

मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस हा इंजिनिअर्स डे म्हणून साजरा होत आहे. असे संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील यांनी सांगत प्रवराच्या शैक्षणिक संस्थेमध्ये विविध उपक्रम साजरे होत असतांना, सामाजिक बांधिलकी जपली जाते.

या भागात तांत्रिक शिक्षण आणि आरोग्य सेवा देत असतांना सामान्य जनता हा मुख्य केंद्र बिंदु असणार आहे. माहिती तंत्रज्ञानातून सक्षम आणि निरोगी युवा पिढी उभी राहण्यासाठी संस्था कायमंच कटीबध्द राहिल असे डॉ. सुश्मिता विखे यांनी सांगितले.

प्रारंभी यावेळी डॉ. कल्पना गडसिंग, डॉ.सागर डुकाले, डॉ. संजय महाडीक, डॉ. सर्जेराव फटांगरे, डॉ. बिपीन रोहमारे, डॉ. सागर सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभियांत्रिकी प्राचार्य डॉ. गणेश शिंदे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय तांबे,डॉ.बाळासाहेब घुले , प्रा.वैभव खर्डे, कॅम्पस सुपर वायझर वनिता सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT