eye infection Epidemic of eye disease increased in Sinnar taluka nashik news sakal
नाशिक

Eye Infection : सिन्नर तालुक्यात संसर्गजन्य साथीमुळे डोळ्यांचे विकार; आरोग्य खाते उदासीन

आरोग्य केंद्रांत औषध नसल्याने मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा

Eye Infection : गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील शहरांसह पंचाळे गाव व परिसरातील गावांमध्ये डोळे येण्याच्या साथी रोगाचा प्रसार वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत, हा संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकाकडे पाहण्यामुळे किंवा संपर्कामुळे हा आजार होत आहे.

मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर यासाठी ड्रॉपच नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. (eye infection Epidemic of eye disease increased in Sinnar taluka nashik news)

डोळे आल्यानंतर डोळ्यातून चिकट द्रव ओघळतो. डोळे लाल होऊन जोरात चुरचुरतात. तसेच त्यामुळे डोकेही दुखते. परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शाळेच्या उपस्थितीवरही परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थी काळ्या रंगाचे चष्मे वापरुन शाळेमध्ये येत असून काही विद्यार्थी घरी राहणेच पसंत करत आहेत.

तालुक्यामध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव यापुढील काळातही वाढण्याची शक्यता आहे. प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेकडे डोळे येण्याच्या साथीवरील ड्रॉप व औषधांची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून अद्यापही ही औषधे आलेली नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तरीही आरोग्य खाते उदासीन असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारावरील ड्रॉप अथवा औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपचारासाठी गेलेल्या तेथील डॉक्टर खाजगी मेडिकलमध्ये ड्रॉप घेण्यास सांगत आहेत.

त्यामुळे नागरिकांना प्रत्येकी ५० ते १०० रुपये खर्च करून डोळ्याचे ड्रॉप विकत घेण्याची वेळ आली आहे. शासनाकडून यासाठी वेगळा निधी दिला जात नसल्याने केस पेपरच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी यासाठी वापरला जातो.

मात्र, रुग्णांची संख्या मोठी असल्याने वेदनाशामक गोळ्या देऊन तात्पुरत्या स्वरुपात त्यांची बोळवण रुग्णांना केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकान्यांनी व लोकप्रतिनिधींनी याबाबतीत दक्ष राहून नागरिकांच्या या आजाराच्या साथीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. आरोग्य केंद्रामध्ये ड्रॉप उपलब्ध नसल्याने आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT