Nylon Manja News sakal
नाशिक

Nashik News : मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजा ने कापला चेहरा

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून येणाऱ्या दगू नाना वाघ 50 रा. कहांडळवाडी यांच्या चेहऱ्याला नायलॉन मांजा ने कापल्यामुळे गंभीर जखम झाली.

श्री. वाघ हे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कहांडळवाडी येथून वावीला दळण दळण्यासाठी दुचाकीवरून येत होते. वावी येथील नूतन विद्यालयाजवळ आल्यावर ते गावात वळत असताना पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. (Face cut with nylon manja on Makar Sankranti day Nashik News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

त्यांनी या मांज्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पलीकडच्या बाजूने मांजा ओढल्या जात असल्याने त्यांच्या नाकपुडीपासून हनुवटीपर्यंत चेहऱ्याचा भाग कापला गेला. त्यांच्या गालावर सुमारे पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची व अर्धा सेंटीमीटर खोलीची जखम झाली.

रक्तस्राव होत असल्याने त्यांना स्थानिक रहिवाशांनी मदत करत दवाखान्यात आणले. मात्र जखम खोलवर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सिन्नरला जाण्याचा सल्ला दिला. 108 रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर टाके टाकण्यात आले. जखम मोठी असल्याने सुमारे दहा टाके टाकून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आले. नायलॉन मांजाने इजा होण्याची वावी येथील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. नायलॉन मांजा वापरास व विक्रीला बंदी असताना देखील राजरोसपणे पतंगबाजांकडे नायलॉन मांजा दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Australia: IND मध्ये रंगणार AUS vs ENG कसोटी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO ने दिले मोठे संकेत; BCCI सोबत चर्चेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

SCROLL FOR NEXT