Power supply cut off esakal
नाशिक

मॉन्सून लांबल्यास पाणी कपातीचे संकट ओढविणार

कुणाल संत

नाशिक : शहर व जिल्ह्यात अद्यापही म्हणावा तशा पावसाला सुरवात झालेली नाही. पुढील काही दिवसामध्ये मॉन्सून लांबल्यास शहरावर पाणीकपातीचे ढग आहे. कारण गंगापूर धरणामध्ये केवळ २९, तर धरण समूहामध्ये २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरणसमूह, दारणा धरण (चेहेडी बंधारा) व मुकणे धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, चालू मॉन्सून हंगामामध्ये पावसाळा लांबल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत गंगापूर धरणात अखेर २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर, समूह धरणांमध्ये २५ टक्केच पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी गंगापूर धरणात ४० टक्के, तर समूहामध्ये २९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. असे असतानादेखील महापालिकेकडून आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीची घोषणादेखील केली होती. मात्र, त्यानंतर दमदार पाऊस झाल्याने ही कपात टळली होती. धरणातील पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेकडून यापूर्वीच नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जर पुढील काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यास प्रशासनावर पाणी कपातीचा निर्णय घेण्याची वेळ येणार आहे.

धरण चालू साठा (टक्केवारीत) मागील साठा

गंगापूर २९ - ४०

कश्‍यपी १७ - १७

गौतमी १६ - ३१

आळंदी ०३ - १०

पालखेड धरण समूह

दारणा १९ - २६

मुकणे ३६ - २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT