SSC Result esakal
नाशिक

SSC Result : शालेय शुल्काअभावी नापास केलेल्या ओमची यशाला गवसणी

शालेय शुक्ल न भरल्याने शाळेने नापास केलेल्या या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (नाशिक) : शालेय शुक्ल न भरल्याने शाळेने नापास केलेल्या, परंतु शिक्षण विभागाने खास परवानगी दिलेल्या ओम आघाव या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळविले.

लॉकडाउनमध्ये आर्थिक विवंचनेमुळे पालकांकडे शुल्क आकारणीचा तगादा न लावण्याचे व विद्यार्थ्याला नापास न करण्याच्याही सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. असे असताना रानेनगरच्या सेंट फ्रान्सिस स्कूलने ओम दत्तू आघाव या विद्यार्थ्याला नापास केल्याची तक्रार दत्तू आघाव यांनी केली होती.

शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जात असल्याने पालकाने व्यथित होऊन नाशिक पॅरेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांच्याकडे धाव घेतली. तक्रारीची गंभीरतेने दखल घेत श्री. साळुंखे यांनी संबंधित प्रकरणी शिक्षण विभागास चौकशी करून विद्यार्थ्यास तत्काळ न्याय देण्याबाबत निवेदन सादर केले. याप्रकरणी नियमानुसार कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त होऊन नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे साळुंखे व प्रदीप यादव यांच्या नेतृत्वाखाली पालक दत्तू आघाव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडत आंदोलन केले. प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांशी फोनवर बोलून याप्रकरणी द्विसदस्यीय समिती नियुक्त करून चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्याचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याचे निर्देश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास दिले.

शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत शाळेच्या गैरकारभाराला जोरदार धक्का देत ओम आघाव याने घवघवीत यश संपादन केले आहे. अन्यायाबाबत लढा देणारे असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचे पालक दत्तू आघाव यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: नाइन्टी मारली अन् अंगात आणली... PMPL बस अडवली! पुण्यातील मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल

Farmers Desperate : 'दर पडल्याने शेपू, कोथिंबिरीवर फिरविला रोटावेटर'; शेतकरी हतबल, भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

Latest Marathi News Updates : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू!आंदोलन सुरू

Maharashtra ITI: शासकीय आयटीआय देणार ‘दत्तक’; कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे कार्यवाही

Solapur Crime : आगरवाल हल्लाप्रकरणी सहा जणांना पोलिस कोठडी; २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT