Suspect Bapu Awhad and in the second photograph a fake appointment letter issued to the youth who were cheated
Suspect Bapu Awhad and in the second photograph a fake appointment letter issued to the youth who were cheated esakal
नाशिक

Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणारा तोतया आर्मी अधिकारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत तरुणाची लाखो रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बनावट लष्करी अधिकाऱ्यास अटक केली आहे. बापू आव्हाड (रा. आंबेगाव, ता. येवला) असे या तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. या तोतया अधिकाऱ्याने आतापर्यंत अंदाजे ३५ लाख रुपयाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संशयितास न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Fake army officer arrested for defrauding youth financially by luring them with jobs Nashik Crime News)

पाचोरे (ता. निफाड) येथे राहणाऱ्या गणेश नागरे यांचा संपर्क संशयित बापू आव्हाड यांच्यासोबत झाला असता त्याने मी लष्करात अधिकारी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी माझे चांगले मित्र आहे त्यांच्यामार्फत तुला नोकरी लावून देतो. असे आमिष नागरे यास दिले. त्यानंतर संशयित याने आपले साथीदार भरत कांबळे (रा. आनंदवाडी, श्रीगोंदा), राहुल गुरव (रा. बाभूळगाव, जि.बीड), विशाल बाबर (रा. डोळेवाडी, ता. कऱ्हाड) याना लासलगाव येथे बोलावून आम्ही सर्व लष्करात असल्याचे सांगितले.

त्यानंतर गणेश नागरे याचा विश्‌वास संपादन करत त्याच्याकडून वेळोवेळी पाच लाख ५० हजार रुपये घेत त्याला प्रशिक्षणासाठी डेहराडून येथे बोलाविले. त्यानंतर त्याचे मेडिकल करत त्याला पुन्हा घरी पाठविले. त्यानंतर त्यास पुन्हा नियुक्ती पत्र देण्याच्या बहाण्याने डेहराडून येथे बोलावीत त्यास त्याच्या नियुक्तीचे पत्र दाखवीत लवकरच तुला बोलाविले जाईल असे सांगितले.

त्यानंतर गणेश याने नियुक्तीपत्र मागितले असता त्यांनी ते दिल्याने त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात संशयित बापू आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार उघड झाला व बापू आव्हाड हा सैन्यदलात नसल्याचे उघड झाले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

अशाच प्रकारे संशयित यांनी आकाश यादव ( रा. शिरवाडे वाकद, ता. निफाड) याची ५ लाख ७५ हजार, निवृत्ती सानप (रा. धारणगाव, निफाड) याची ४ लाख ८७ हजार, भगवान घुगे (रा. पास्ते, सिन्नर) याची ५ लाख ५० हजार , राहुल आव्हाड (रा. आंबेगाव, येवला) यांची ५ लाख ५० हजार, अक्षय सानप (रा. अंधेरी मुंबई) यांची २ लाख ३० हजार तर अमोल खेडकर (रा. एकनाथवाडी, पाथर्डी) यांच्याकडून ५ लाख ५० हजार असे लाखो रुपये उकळले.

सदर घटनेचा तपास लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोलिस कर्मचारी कैलास महाजन, भगवान सोनवणे ,प्रदीप आजगे, सुजय बारगळ करत आहे.

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणचा मान

बापू आव्हाड हा सैन्य दलात मोठ्या पदावर असल्याने त्यांच्या आंबेगाव येथील लोकांनी तो सैन्यात मोठ्या पदावर असल्याचे त्यास २६ जानेवारी २०२२ ला जिल्हा परिषद शाळेत त्याच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले होते.

तक्रारीचे आवाहन

जर तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अशा प्रकारे संशयित बापू आव्हाड याने फसवणूक केली असल्यास त्यांनी ताबडतोब लासलगाव पोलिस स्टेशनला संपर्क करावे असे आव्हान राहुल वाघ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT