Fake  esakal
नाशिक

Nashik Crime News : ग्रामपंचायतीचा बनावट दाखला वापरला; संशयिताविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मडकीजांब येथे एकाने बनावट गावठाण प्रमाणपत्राचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बनावट दाखल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Fake Gram Panchayat certificate used case filed against suspect Nashik Crime News)

मडकीजांब येथे ग्रामपंचायतीमध्ये एक गावठाण प्रमाणपत्राच्या दाखल्याची प्रत उपसरपंच अनिल वडजे यांना बघावयास मिळाली. त्या प्रमाणपत्रावर संशय आल्याने त्यांनी ग्रामसेवक समाधान शेवाळे यांना दाखल्याची खातरजमा करण्यास सांगितले.

शेवाळे यांनी त्याची शहानिशा केली असता मडकीजांब येथील भास्कर काशिनाथ जगताप यांना मिळकत घर नं. ७३४ वर गावठाण प्रमाणपत्र असे उल्लेख करून त्यावर मडकीजांब ग्रामपंचायतीचा गोल शिक्का व ग्रामसेवकाच्या सहीसह शिक्का मारलेला आढळून आला.

त्यावर केलेली सही ग्रामसेवक शेवाळे यांची नसल्याची खात्री शेवाळे यांना झाली. शेवाळे यांनी हा दाखला बनावट असल्याची माहिती उपसरपंच अनिल वडजे यांना दिली. त्यावरुन भास्कर जगताप यांना विचारपूस केली असता कर्ज प्रकरण, कागदपत्र बनवण्यासाठी सोमनाथ पगारे यांना पाच हजार रुपये दिल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यावेळी हा दाखला सोमनाथ नाथा पगारे यांनी दिल्याची माहिती भास्कर जगताप यांनी दिली. यावरुन ग्रामसेवक शेवाळे यांनी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना लेखी स्वरूपात कळविले असता संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.

त्यानुसार ग्रामसेवक शेवाळेंनी सोमनाथ पगारे याच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाचा बनावट लेटरपॅड, बनावट शिक्के तयार करून ग्रामसेवकाची बनावट सही केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे व दिंडोरी पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT