Fake Medical Certificate case esakal
नाशिक

Fake Medical certificate Case : अखेर ‘तो’ गुन्हा आडगाव पोलिसांकडे वर्ग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बहुचर्चित नाशिक ग्रामीण पोलिस दलातील आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भातील गुन्हा नाशिक तालुका पोलिस ठाण्यातून शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील आडगाव पोलिस ठाण्याकडे अखेर वर्ग करण्यात आला आहे.

या संदर्भातील तपासाचा अहवाल नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस महासंचालक कार्यालयास दिला होता.

त्यावर पोलिस महासंचालक कार्यालयाने गुन्ह्याची नोंद अधिकारक्षेत्राबाहेर झाल्याचा ठपका ठेवत, तो गुन्हा शहर आयुक्तालयाच्या आडगाव पोलिसात वर्ग करण्याचे निर्देश दिले असता, त्यानुसार सदरील गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. (Fake Medical Certificate Case crime filed with Adgaon Police nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

नाशिक ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांसाठी २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या महिला लिपिकासह नाशिक जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सकांसह अधिकारी-कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला.

याच गुन्ह्याच्या तपासाचा अहवाल नाशिक तालुका पोलिस ठाण्याने ग्रामीण अधीक्षक कार्यालयास दिला. तोच अहवाल अधीक्षक कार्यालयामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस महासंचालक कार्यालयास सादर करण्यात आला.

या अहवालात पोलिस महासंचालक कार्यालयाने अधिकारी क्षेत्राबाहेर जाऊन गुन्हा नोंद केल्याच्या बाबीवर ठपका ठेवला. त्यामुळे सदरील गुन्हा नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या आडगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वीच सदरील गुन्हा तत्काळ आडगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT