crime esakal
नाशिक

Nashik Crime News : तोतया ‘पीए’ निघाला खातेदार

भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून मुख्यमंत्र्याच्या तोतया पीए यास अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून मुख्यमंत्र्याच्या तोतया पीए यास अटक करण्यात आली आहे. तोतया पीए जिल्हा बँकेचा खातेदार असल्याची माहिती समोर आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते. (Fake PA turned out to be account holder nashik crime news )

गोपनीय माहिती आणि तांत्रिक प्रणालीनुसार गुन्हे शोध पथकाकडून संशयिताचा शोध घेण्यात आला. लेखानगर, सिडको येथील संशयित असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने त्यास लेखानगर येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संशयित जिल्हा बँकेचाच खातेदार असल्याची माहिती उघड झाली. तसेच कानडे नाव बनावट असून, त्याचे मूळ नाव वेगळे असल्याचेही समजले. अधिक चौकशी सुरू असल्याने त्याचे नाव गुपित ठेवण्यात आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १८ जून २०१८ ते १० ऑगस्ट २०२० दरम्यान झालेल्या एका व्यवहाराची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे यांचा संशयित मित्र असल्याची माहितीही समोर आली आहे.

केवळ मित्रास त्याचा गेलेला रोजगार परत मिळावा, या उद्देशातून फोन केल्याची प्राथमिक कबुली संशयिताने पोलिसांना दिली आहे. तरीदेखील आणखी काही माहिती समोर येते का, यासंदर्भात पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT