Red onion prices News esakal
नाशिक

Red Onion : लाल कांद्याच्या बाजारभावात घसरण! येवल्यात आवक टिकून; अवकाळीमुळे शेतकरी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : सप्ताहात येवला व अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा आवक टिकून होती, तर बाजारभावात सरासरी ६५० रूपयांपर्यंत घसरण झाली. एकीकडे भावात घसरण, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. (Fall in market price of red onion Farmers suffer due to bad weather nashik news)

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम, ओरिसा, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांत व परदेशातही मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांद्याची ८९ हजार १३९ क्विंटल आवक झाली.

लाल कांद्याचे बाजारभाव १५० ते ९४४, म्हणजेच सरासरी ६५० रुपये प्रतिक्विटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची आवक ६३ हजार २१९ क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव १५० ते ९९१, तर सरासरी ६५० रुपये प्रतिक्विटल पर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेतही वाढ झाली. तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची आवक ३४२ क्विंटल झाली.

बाजारभाव १ हजार ९५१ ते २ हजार ४६०, तर सरासरी २ हजार १०० रुपयांपर्यंत होते. बाजरीची आवक ७ क्विंटल झाली असुन, बाजारभाव १९०० ते २०२५, तर सरासरी दोन हजारांपर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. हरभऱ्याची आवक २०३ क्विंटल झाली. बाजारभाव ४ हजार ते ६ हजार १८२, तर सरासरी ५ हजार ९०० रुपयांपर्यंत होते.

तुरीच्या आवकेत घट झाली. व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. आवक २१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ६ हजार ते ७ हजार ३०१, तर सरासरी ७ हजार १०० रुपयांपर्यंत होते.

सोयाबीनची आवक व स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभावही स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची आवक १४० क्विंटल झाली. बाजारभाव ४०५१ ते ५०७५, तर सरासरी ४९५० रुपयांपर्यंत होते.

मकाच्या आवकेत घट झाली, तर मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची आवक १३०५ क्विंटल झाली. बाजारभाव १९०१ ते २१४०, तर सरासरी २१११ रपये प्रति क्विंटलपर्यंत होते. बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT