bike accident 123.jpg 
नाशिक

मामाची भेट अपूर्णच.. लहान लेकरं मुकली आईच्या प्रेमाला.. विवाहितेवर काळाचा घाला..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : सोनाली यांचे माहेर हे करंजवण असून, माहेरी कामानिमित्त आले होते. तेथे रविवारी (ता. 24) मुक्कामी राहिल्यानंतर सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान दोन लहान मुलांना करंजवण येथे ठेवून काजीमाळे येथील मामास भेटण्यासाठी पतीसमवेत चालली होती..पण त्यातच घातला काळाने घाला..अन् मग..

अशी घडली घटना

भनवड- लखमापूर रस्त्यावरील दहिवी गावाजवळील पुलाजवळ दुचाकीचालक ईश्‍वर शिंगाडे यांचा दुचाकीवरून ताबा सुटून दुचाकी पुलावरून सुमारे वीस ते पंचवीस फूट खाली कोसळली. यात सोनाली यांच्या डोके व तोंडास गंभीर मार लागून त्या जागीच ठार झाल्या. तर ईश्‍वर शिंगाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनाली यांचे माहेर हे करंजवण असून, माहेरी कामानिमित्त आले होते. तेथे रविवारी (ता. 24) मुक्कामी राहिल्यानंतर सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान दोन लहान मुलांना करंजवण येथे ठेवून काजीमाळे येथील मामास भेटण्यासाठी पतीसमवेत दुचाकीवरून जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. याबाबत वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. 

मामांना भेटण्यासाठी जाताना हा अपघात

लखमापूर-भनवड रस्त्यावरील दहिवी गावाजवळील पुलावरून दुचाकी कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 25) घडली. शिवनई (ता. दिंडोरी) येथील ईश्‍वर शिंगाडे (वय 38) हे पत्नी सोनाली शिंगाडे (वय 35) सह दुचाकीने करंजवण येथून माळेगाव काजी येथे सोनालीच्या मामांना भेटण्यासाठी जाताना हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT