Vegetables esakal
नाशिक

घसरले भाज्यांचे दर; मेथीची जुडी अवघ्या 10 रुपयांत

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह बुधवारच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांसह फळ भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मोठ्या आवकेनंतर मागणी नसल्याने भाज्यांचे दर सर्वसामान्य गृहिणींच्या आटोक्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी चाळीस ते पन्नास रुपयांना मिळणारी मेथीची जुडी अवघी दहा रूपयांत उपलब्ध होती.

भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये

पितृपक्ष व त्यानंतर आलेल्या नवरात्रात पालेभाज्यांचे दर तेजीतच राहिले. या काळात मेथीच्या एका जुडीसाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते. या काळात कोथिंबीर, गवार यांचे भावही गगनाला भिडल्याने अनेक गृहिणींचे बजेट कोलमडून गेले होते. परंतु, दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून पालेभाज्या, फळ भाज्यांसह वेलवर्गीय भाजीपाला आवकेत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम आठवडे बाजारातील भावांवर होऊन सर्वच प्रकारच्या भाज्या गृहिणींच्या बजेटमध्ये आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून म्हणजे दिवाळीपासून रोडावलेला हा बाजार चांगलाच बहरला. त्यामुळे खरेदीसाठी सायंकाळी गंगाघाटावर पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी गर्दी झाली होती.

परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केल्याने मागील आठवड्यापर्यंत मेथी, कोथिंबिरीच्या दरांत मोठी वाढ झाली होती. बाजार समितीतही त्यांना विक्रमी भाव मिळत होता. परंतु, गत दोन दिवसांपासून मेथीसह कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने दरांत मोठी घसरण होऊन मेथी व कोथिंबिरीची जुडी अवघ्या दहा रूपयांत उपलब्ध होती. इतर भाज्यांनाही मागणी नसल्याने भावात मोठी घसरण झाल्याचे चित्र होते.

भाज्यांचे दर असे -

मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू - १० रुपये जुडी
वांगी - ३० ते ४० रुपये. किलो
टोमॅटो - २० ते ३० रुपये
बटाटे - २० ते ३० रुपये किलो
गवार (गावठी) - ६० ते ८० रुपये किलो
हिरव्या मिरच्या - ४० रुपये किलो.
कारली - ३० ते ४० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT