Rizwan Qureshi 
नाशिक

संसाराचा सारीपाट मांडण्यापूर्वीच विस्कटला; कुटुंबियांवर शोककळा

युनूस शेख

जुने नाशिक : वाडीवऱ्हे येथे बुधवारी (ता. २१) झालेल्या अपघातात जुने नाशिकमधील रिजवान कुरेशी याचा मृत्यू कुटुंबावर घाला घालणारा ठरला आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता वडिलांवर आली आहे, तर आठ महिन्यांपूर्वीच विवाह झालेला असल्याने संसाराचा सारीपाट मांडण्यापूर्वीच नववधूचेही सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. (family mourns the death of Rizwan Qureshi in an accident at wadivarhe)

नागरिकांनी व्यक्त केली हळहळ

कुरेशी कुटुंबीयांचा रिजवान हाच आधार होता. आई, वडील, लहान भाऊ आणि नवविवाहित पत्नी अशा सर्वांची जबाबदारी त्याच्यावरच होती. मटण विक्रीचा व्यवसाय करून तो कुटुंब चालवत होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात त्याचा विवाह झाला. त्यानंतर दोघेही सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना बुधवारचा (ता.२१) दिवस त्या नवदांपत्यांसह कुरेशी कुटुंबीयांसाठी जीवनात अंधार पसरविणारा ठरला. रिजवानच्या जाण्याने त्या नववधूचे आयुष्य उद्ध्वस्त तर झालेच, शिवाय कुरेशी कुटुंबीयांचा आधारदेखील हिरावला गेला. मनमिळाऊ स्वभाव असलेला रिजवान आपल्यात नाही, या विचाराने त्याचा मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्या नववधूच्या जीवनात कधी न भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता.२२) दुपारच्या सुमारास त्याचा दफनविधी करण्यात आला. कुटुंबीयाच्या आक्रोशाने संपूर्ण परिसरातील रहिवाशांना गहिवरून आले.

दुवा में याद रखना

दरम्यान, अपघातात मृत तरुणांचा मित्र नबिल सय्यदही होता. सुदैवाने तो वाचला. परंतु तोदेखील गंभीर जखमी आहे. गुरुवारी त्याच्याबाबत नको त्या अफवा पसरवल्या जात होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, यासाठी सर्वांनी दुवा ( प्रार्थना) करावी अशा प्रकारचे संदेश सय्यद कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहेत.

(family mourns the death of Rizwan Qureshi in an accident at wadivarhe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

Pirangut Accident : पिरंगुट घाटात भीषण अपघात; तिघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT