nandgaon family 25.jpg 
नाशिक

नांदगाव हत्याकांड अपडेट्स : मालेगाव पोलीसांपुढे तपासाचे आव्हान; घटनास्थळी झुंबड

भारत देवरे

नाशिक / नांदगाव : मालेगाव तालुक्यातील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती-पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे मालेगाव - नांदगाव तालुका हादरला आहे. मालेगाव पोलीसांपुढे या हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान आहे.

कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात
समाधान आण्णा चव्हाण( ३७) भरताबाई चव्हाण  (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण( ४) अशा एकाच कुटुंबातील ही हत्या करण्यात आल्याने अख्खा तालुका हादरला आहे. पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहचले असून याचा अधिक तपास करत आहेत.

घटनेची माहिती देऊनही उशीरा पोहचली पोलीस

सकाळी साडेसातला कळवूनही पोलीस पोहचले नसल्याचे तेथील सरपंचाचे पती व शिक्षक नेते संजय चव्हाण यांनी सांगितले. मालेगाव तालुक्यातील हद्दीतील घटना तपास मालेगाव तालुका ग्रामिणकडे असून आता पोलीसांसमोर आव्हान आहे. हत्या झालेले कुटुंबीय सर्व वाखारी ता. नांदगाव चे रहिवाशी असून जेऊर शिवारात मळ्यातल्या वस्तीवर ते राहत होते.

मालेगाव पोलीसांपुढे तपासाचे आव्हान...घटनास्थळी झुंबड.. 

दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्यानै मोठी खळबळ उडाली. समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता. बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे.

रिपोर्ट - भारत देवरे

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Dombivli: राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसे आक्रमक; संबंधिताविरोधात एनसी दाखल

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

SCROLL FOR NEXT