नाशिक

माणूसकीचा आटला झरा! गावाकडे परतणाऱ्या कुटुंबाची काय ही अवहेलना? 

माणिक देसाई : सकाळ वृतसेवा

नाशिक / निफाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाल्याने सुखी जीवनाची स्वप्न पाहणाऱ्या परभणीच्या देवकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. पुन्हा उपासमारीची वेळ कुटुंबावर आली व त्यांना पडघा सोडण्यास भाग पडले. अखेर देवकर कुटुंबातील 16 लहान मोठ्यांची पडघ्यावरून पायपीट सुरू झाली. या कुटुंबात 8 लहान मुलं, मुली आहेत. भर उन्हात पायपीट करताना या लहान मुलांच्या पायात चप्पल ही नाही. महामार्गावरून प्रवास करताना या कुटुंबियांना दिवस - रात्र काही लोकांनी हुसकावून दिले. निफाड तालुक्‍यात कादवा नदी दिसली म्हणून अंघोळीस थांबले तर तेथून ही या कुटुंबाला दमदाटी करत हुसकावून लावण्यात आले. यामुळे माणुसकीचा झरा आटल्याचा अनुभव त्यांनी घेतला. 

अनाहूत ओढावलं संकट 
स्वतः च्या गावात पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळत नसल्याने कुटुंब कबिला घेवुन मोलमजुरीसाठी थेट मुंबईच्या दिशेने गेलेल्या परभणी जिल्ह्यातील संजय देवकर कुटुंबाला पडघा येथे कामही मिळालं. पण काम मिळाल्याचा आनंद घेत असतानाच अनाहुतपणे कोरोना विषाणूच संकट ओढावलं अन जणू आभाळच या कुटुंबावर कोसळलं. यामुळे पुन्हा एकदा कच्याबच्यांना घेवुन 16 सदस्यांच्या या कुटुंबाला गावाकडं निघावं लागलं. निफाडला आल्यानंतर शांतीनगर त्रिफुली जवळ निफाड इंग्लिश स्कुलसमोर चालून चालून थकलेले, भुकेने व्याकूळ कुटुंब हतबल होऊन नाशिक - औरंगाबाद रोडवर सावलीत बसले. 

अंगावर शहारे अन डोळ्यांत पाणी 
काही सदस्य महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना लिफ्टसाठी हात देत होते पण वाहने थांबली नाहीत. यावेळी येथे आलेले देविदास बैरागी व सामाजिक कार्यकर्ते सुनिल बोराडे यांनी देवकर कुटुंबाची विचारपूस केली असता त्यांची व्यथा ऐकून अंगावर शहारे अन डोळ्यांत पाणी ही आले. कुटुंब रडू लागले, भूक लागली आहे. रात्रीपासून आम्ही व आमची लेकरं उपाशी आहोत हे ऐकताचा बोराडे यांनी बिस्किटे वाटप केली तर टीलु कापसे यांनी खाऊ दिला. तसेच बोराडे यांनी आंघोळीसह त्यांच्या जेवणाची व्यवस्था हि केली. कुटुंबप्रमुख संजय देवकर यांनी कुटुंबाचे हाल पडघ्यापासून सुरू झाले व निफाडला थांबल्याचे सांगत आभार मानले. रडत - रडतच त्यांनी सरकारने आता तरी आम्हाला घरी जाण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. अशी वेळ कुणावरही येऊ नये व आमच्यासारखे कुटूंब कोरोनाच्या संकटात सापडल्यास नागरिकांनी मदत करावी, हुसकावून देऊ नका, मारू नका, शिवीगाळ करू नका, असे आवाहन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या मतदार याद्यांमध्ये घोळ? आढळले चक्क नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारचे नागरिक

चाकूने वार करत डोकं भिंतीवर आपटलं!अभिनेत्रीला नवऱ्याने केली मारहाण, डोळ्यात मिरी पावडर फेकून केले वार

WHO Action : WHO कडून शेख हसीना यांना मोठा धक्का, मुलगी सायमा वाजिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; पदावरून केली हकालपट्टी?

Lumpy Affected:'साेलापूर जिल्ह्यात ९०० जनावरे लम्पीबाधित'; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Shravan 2025 Upvas Recipe: श्रावणात उपवासासाठी बनवा गरमागरम भगर-आमटी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT