महेंद्र शंकर वाघ.jpg
महेंद्र शंकर वाघ.jpg 
नाशिक

धक्कादायक! शेतकऱ्याचं पाणी भरायचं निमित्त अन् अवघ्या काही सेंकदातच होत्याचं नव्हतं...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दहीवड) येथील पिंपळे मळा परिसरात सोमवारी (ता.25) सकाळी दुर्देवी घटना घडली. शेतात पिकाला पाणी भरायचं निमित्त मात्र झाले...अन् यातच अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं...अन् सगळ्या गावावरच जणू शोककळा पसरली. 

अशी घडली घटना

दहीवड येथील पिंपळे मळा परिसरात सोमवार (ता.२५) रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. महेंद्र शंकर वाघ (३२) शंकर निंबा वाघ यांचा मुलगा महेंद्र शेतात गेले होते. विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र वाघ शेतातील विहिरीवर वीज मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले होते. वीज मोटर पंपच्या स्विचमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला व ते जमिनीवर कोसळले त्यांना तत्काळ दहीवड येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना दहीवड उपकेंद्रातुन देवळा येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबिय पुरते हदरुन गेले. देवळा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात वडील, पत्नी, मुलगी, भाऊ परिवार आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT