Farmer died in leopard attack Sakal
नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; परिसरात भीतीचे वातावरण

दिपक खैरनार

रात्रभर पत्नी व दोन मुले दरवाजाकडे आस लावून होते. पप्पा कधी येतील, असा केविलवाणा प्रश्‍न मुले विचारत होती. सकाळी घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून गेला.

अंबासन (जि. नाशिक) : नांदिन शिवारातील युवा शेतकरी नंदकिशोर पवार शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने जवळच असलेल्या पोल्ट्री फॉर्मवर अंडी घेण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आलेच नाहीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही, सकाळी पुन्हा नातेवाइकांनी पिसोळबारी घाटात शोधाशोध केली असता नातेवाइकांना समोरचे दृश्य दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. (Farmer died in leopard attack)

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून गस्त वाढणार

दरेगाव, नांदिन शिवारातील युवा शेतकरी नंदकिशोर पवार शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच- ४१- एम- ९५७) जवळच असलेल्या साक्री तालुक्यातील दिघावे गावातील पोल्ट्री फॉर्मवर अंडी घेण्यासाठी गेले होते. पिसोळबारी घाटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांना दुचाकीवरून खाली पाडले व फरपटत डोंगरावरील जंगलात नेले. सायंकाळी अंडी घेण्यासाठी गेलेल्या पवार यांचा कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. सकाळी पुन्हा नातेवाइकांनी पिसोळबारी घाटात शोधाशोध केली असता नातेवाइकांना समोरचे दृश्य दिसताच त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. पवार यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत जंगलाच्या डोंगरावर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जायखेड्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. नामपूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, वन विभागामार्फत परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून गस्त वाढणार असल्याचे वनाधिकारी कांबळे यांनी सांगितले. आमदार दिलीप बोरसे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. शेतकरी नंदकिशोर यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.

‘पप्पा कधी येतील’च्या प्रश्‍नाने हळहळले ग्रामस्थ

परिसरात नंदकिशोर पवार प्रामाणिक व प्रेमळ स्वभावाचे असल्याने नातेवाईक व मित्रमंडळीत जोडले गेले होते. गोराणे येथील भारती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना भावेश (१३) व मुकेश (१०) ही दोन अपत्ये आहेत. नंदकिशोर यांनी दिवसभर शेतात मशागत करून सायंकाळी ते कुटुंबीयांसह अंडी खाणार होते. यासाठी सायंकाळी पिसोळ घाटाखाली दिघावे शिवारातील पोल्ट्रीवर अंडी घेण्यासाठी गेले होते. रात्रभर पत्नी व दोन मुले दरवाजाकडे आस लावून होते. पप्पा कधी येतील, असा केविलवाणा प्रश्‍न मुले विचारत होती. सकाळी घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून गेला.

''शेतकऱ्यांनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी रात्री एकटे न फिरता दोन ते तीन लोक सोबत घेऊन फिरावे. सोबत टॉर्च व काठी ठेवावी, जेणेकरून स्वतःचे संरक्षण करता येईल.''

- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

(Farmer died in leopard attack)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT