Agriculture News esakal
नाशिक

Agriculture News: वांग्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने केले मोफत वाटप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव नेऊर : वांग्याला मातीमोल भाव मिळत असल्याने व खर्चही निघत नसल्याने बाजार समितीत नेण्याचा खर्च करण्यापेक्षा जळगाव नेऊर येथील शेतकरी प्रवीण शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत वांगी वाटप केले. भाजीपाल्यालाही भाव मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्‍न उपस्थित केला.

श्री. शिंदे म्हणाले, शनिवारी (ता.२५) सकाळी पाच कॅरेट वांगी येवल्याला नेले असता २० रूपये प्रती कॅरेटने व्यापाऱ्यांनी मागणी केली. येवल्याला जायला शंभर रूपयाचे पेट्रोल लागले. पाच कॅरेट विकून हाती शंभर रूपये येणार होते. त्यात शंभर रूपये पेट्रोलसाठी अगोदर खर्च केले होते.

हाती एक रूपया पण येत नसल्याने वांग्याची पाच कॅरेट येवल्याहून मुखेड येथे बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी पुन्हा दुचाकीत साठ रूपयाचे पेट्रोल टाकून मुखेडला आणले. मुखेडच्या बाजारात प्रती कॅरेट तीस रूपये प्रमाणे मागणी केली. हाती दीडशे रूपये येणार होते. त्यात जागा भाडे शंभर रूपये जाणार होते.

कुठलेच गणित जमत नसल्याने शेवटी प्रवीण शिंदे यांनी पाचही कॅरेट जशीच्या तशी घरी आणली व ग्रामपंचायतीसमोर मोफत वाटप केले. उरलेली वांगी जनावरांना टाकण्यासाठी वस्तीवर घेवून गेले. जळगाव नेऊर येथील शेतकरी प्रवीण शिंदे यांनी २० गुंठे क्षेत्रात पंचगंगा वांगी लागवड केली. यासाठी त्यांना जवळपास ६५ हजार रूपये खर्च झाला. केलेला खर्चही वसूल होणार नाही अशी परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT