Karan Gaikar and office bearers of Chhava organization while making slogans against the central and state government in Tehsil office.  esakal
नाशिक

Onion Export Ban: निर्यातबंदीसह अनुदानाच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा येवला तहसीलवर शेतकरी जनआक्रोश मोर्चा

मागण्यांची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

येवला : ‘कांदा आमचे लाल सोने, सरकारचे काम दाम देणे’, ‘थकीत कांदा अनुदान त्वरित जमा करा’, ‘सरकारी धोरण शेतकऱ्यांचे मरण’, अशा घोषणा देत छावा क्रांतिवीर सेनेने शुक्रवारी (ता. ९) काद्यांवरील निर्यातबंदी उठविण्यासह शेतीमालाला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला.

मागण्यांची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला. (Farmer protest march of Chava Krantivir Sena in Yeola tehsil to demand subsidy along with onion export ban nashik news)

येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्री. गायकर यांच्या नेतृत्वाखाली विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

तहसील कार्यालयाच्या आवारात ‘कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, अन्यथा खुर्ची खाली करा’, ‘शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या’, शेतकरीविरोधी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘जय जवान जय किसान’ या घोषणा देत केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकार शेतीमालांवर निर्यातबंदी करून हक्काचे पैसे मिळवण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहे. राज्य व देशात हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेती करून कुटुंब जगविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

यामुळे शेतीमालाला हमीभाव द्यावा व कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने पाऊल उचलले पाहिजे. याच भावना आम्ही शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे मांडत असल्याचे श्री. गायकर यांनी सांगितले.

तहसीलदार आबासाहेब महाजन निवेदन घेण्यासाठी आले. मात्र, शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवत नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्यास नकार दिला व निष्क्रिय प्रशासनाचा निषेध केला.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तातडीने उठवावी, कांदा प्रोत्साहन अनुदानाची उर्वरित एकरक्कमी त्वरित द्यावी, केंद्र सरकारच्या अविचारी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यामुळे प्रतिक्विंटल तीन हजार रुपये नुकसानभरपाई केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, कांदा, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना रास्त भाव द्यावा, शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा द्यावा, विना अट पीकविम्याची मदत द्या, या मागण्या करण्यात आल्या.

या मागण्यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास छावा क्रांतिवीर सेना व शेतकऱ्यांतर्फे जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मोर्चात करण गायकर, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोखे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जराड, जिल्हाप्रमुख आशिष हिरे, ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ, जिल्हा संघटक गोरख संत, गिरीश आहेर, वैभव दळवी, योगेश पाटील, विकास काळे, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, भारत पिंगळे, करण शिंदे, निंबा फडताळे, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोटकर, संदीप फडोळ, सागर जाधव, शिवम देशमुख, मयूर पवार, वैभव वडजे, हर्शल पवार, राजाभाऊ खरात, जयेश मोरे, सागर फडोळ, रेखा पाटील, मीनाक्षी पाटील, संगीता वाघ, रूपाली काकडे, दीपाली लोखंडे, सुवर्णा शिंदे, तेजस वाघ, निखिल पवार, प्रफुल्ल गायकवाड, गोरख कोटमे, संदीप जाधव, संतोष कदम, सचिन जाधव, प्रवीण कदम, विजय मोरे, जालिंदर मेंडकर, वाल्मीक पुरकर, विलास डोमसे, भरत पुरकर, कैलास कदम, श्रावण देवरे, संदीप शिंदे, विजय चव्हाण, संदीप पवार आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT