grapes farmer.jpg 
नाशिक

#COVID19 : "कोरोनाचा घाव, त्यात मिळेना द्राक्षांना भाव"..असं म्हणत चक्क तीन एकर द्राक्षबागेवर चालविली  कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / गिरणार : एकीकडे जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यातून नाशिकची द्राक्षेही सुटलेली नाहीत. द्राक्ष विकायला व्यापारी मिळत नाही, चुकून एखादा व्यापारी गवसला तर तोही कवडीमोल द्राक्षांची मागणी करीत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे अक्षरश: वैतागून दुगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविली आहे. त्यामुळे "एकीकडे कोरोनाचा घाव, त्यात मिळेना द्राक्षांना भाव' अशीच स्थिती जिल्ह्यातील बहुतेक द्राक्षबागायतदारांवर ओढावली आहे. 

दुगावच्या शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड 
नाशिक तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात असलेल्या दुगाव येथील शेतकरी मनोहर थेटे याने द्राक्ष काढणीस आलेल्या तीन एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविली आहे. कोरोनाच्या संकटात द्राक्ष काढणीत मातीमोल झाल्याने, द्राक्ष घ्यायला व्यापारी मिळेना. त्यात डोक्‍यावर लाखोंचे कर्ज कसे फेडणार, या विवंचनेतून या शेतकऱ्याने द्राक्ष काढणीत असताना व्यथित होऊन उभ्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालविली. कोरोनाच्या महामारीत अख्खे विश्‍व बेजार आहे. त्यात राज्यात दोनशेहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. ऐन द्राक्ष काढणीच्या मोसमात व्यापारी आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. अशा स्थितीत द्राक्षबागायतदार द्राक्ष देण्यासाठी वणवण फिरत आहेत.

मात्र व्यापारी मिळत नसल्याने या भांडवली पिकाचे बेदाणे करण्यासही काही शेतकऱ्यांनी पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत दुगाव येथील मनोहर थेटे या शेतकऱ्याने उभ्या बागेवर कुऱ्हाड चालविली. आता ही द्राक्षे द्यायची कुठे, असा सवाल व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT