Farmers expressed their anger by throwing onions on the roadside for not calling the auction esakal
नाशिक

Nashik News : लिलाव न पुकारल्याने शेतकऱ्याने फेकले कांदे!

रस्त्याच्या कडेला ओतून देत केला शेतकऱ्याने संताप व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लिलाव सुरू असताना ट्रॅक्टरजवळ येऊनही व्यापारी लिलाव न करताच निघून गेल्याने चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तीस क्विंटल कांदा रस्त्याच्या कडेला ओतून दिला. (Farmer threw onions for not calling auction Nashik News)

कोलटेक पाटे (ता. चांदवड) येथील सचिन विठ्ठलराव गांगुर्डे आणि रवी किसन तळेकर यांनी लाल कांद्याचे पिक घेतले होते. अंतीम टप्प्यातील दुय्यम प्रतवारी असलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांनी दहा ते बारा किलोमिटर अंतरावर लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता.

बुधवारी (ता. १२) दुपारच्या सत्रात लिलावाला सुरवात झाल्यानंतर ट्रॅक्टरजवळ येताच व्यापारी पुढे निघून गेल्याने तळेकर यांनी ‘आपण माझ्या लाल कांद्याचा लिलाव का केला नाही?’ अशी विचारणा केली. त्यावर या कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी लिलावासाठी पुढे निघून गेले. तीन हजार रुपये खर्च करून कांदा विक्रीसाठी आणला होता.

त्यामुळे काहीतरी बाजारभावाने लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र, लीलाव न झाल्याने घरी नेऊन घरच्यांचा संताप करण्यापेक्षा त्यांनी सायंकाळी घरी परत जाताना बाजार समिती आवाराबाहेर काही अंतरावरील बायपासला रस्त्याच्या कडेला हा कांदा ओतून देत संताप व्यक्त केल्याचे तळेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, या संदर्भात बाजार समितीतील सूत्रांशी संपर्क केला असता, संबंधीत शेतकऱ्याने दुपारच्या सत्रात खाद (चोपडा, बिन सालीचा) लिलावासाठी नवीन कांदा मार्केटमध्ये आणला. परंतु, या ठिकाणी फक्त चांगल्या प्रतीचा कांद्याचा लिलाव होतो.

खादीचा लिलाव हा दोन्ही सत्रात जुना कांदा मार्केटमध्ये होत असतो. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सदर माल उद्या सकाळच्या सत्रात जुन्या मार्केटमध्ये नेल्यास तेथे लिलाव होऊ शकतो, असे सांगितल्यावर त्यांनी याला मान्यता दिली. परंतु, नंतर त्यांनी बायपास रोडने एडीएफ खळ्याजवळ आपल्या ट्रॅक्टरमधील कांदा ओतून दिल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT