chandwad.jpg 
नाशिक

"साहेब आले..पंचनामा झाले..आश्वासने दिली.. मात्र दमडी भेटलीच नाही..!"

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / चांदवड : दोन एकर शेतीवर त्यांचे घर चालायचे...नोव्हेंबर मध्ये अतीवृष्टी झाली आणि काही तासात होत्याच नव्हत झाल...पाहणी करण्यासाठी अनेक साहेबांची पथक आली. आमदार सुध्दा होते. सर्व म्हणाले.. घाबरु नका...सरकार तुमच्या पाठीशी हाय.. पण आता आठ महिने उलटले तरी एक रुपयाची मदत भेटली नाही....आता उघड्या पडलेल्या खडकात हिरव स्वप्न पाहात जगायच कसं असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारण्यात येतोय.

फोटो काढून गेले ते आजपर्यंत फिरकले नाही..

शिंगवे (ता. चांदवड) येथील शेतकरी दशरथ शिंदे व मंगलबाई शिंदे या दाम्पत्याची शिंगवे शिवारात दोन एकर शेती आहे. याच दोन एकरांवर हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत होते. नोव्हेंबर मध्ये अतिवृष्टी झाली अन्‌ कांद्याच्या उभ्या पिकांसह त्यांच अख्ख शेतच वाहून गेलं. वाहून गेलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी थेट केंद्रीय पथकच त्यांच्या शेतात आलं.या पथकाबरोबर विभागीय आयुक्त राजाराम माने, आमदार डॉ राहुल आहेर, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या सह सर्वच अधिकारी पदाधिकारी आले होते. त्या दिवशी पाहून फोटो काढून गेले ते आजपर्यंत कोणी त्यांची विचारपूस करायला सुद्धा आलं नाही.

कर्ज फेडण्यासाठी कष्ट करायचे बस एवढचं...
तरीही खचून न जाता हात उसने करून कर्ज काढून, शेजारच्या शेतकऱ्यांची मदत घेऊन या दाम्पत्याने आपली शेती पुन्हा तयार केली. शेती तयार करताना गावातीलच जे सी बी वाले मढे, ज्यांच्या शेतातून चारशे ट्रॉली माती आणली ते लक्ष्मण आहेर यांनी मदतीचा हात दिला. आज पुन्हा नव्याने सरकारच्या मदतीशिवाय उभं राहून या जिद्दी शेतकऱ्याने आपल्या शेतात मका,भुईमूग करून शेत हिरवंगार केलं आहे. आता नशीबाने अन्‌ निसर्गानं साथ दिली तर घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कष्ट करायचे बस एवढीच या दाम्पत्याची अपेक्षा आहे. 

हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदतही नाही
" नोव्हेंबर च्या अतिवृष्टीत अशा अनेक शेतकऱ्यांचे शेत वाहून गेले यापैकी कुणालाही मदत मिळाली नाही. हे सगळे नुकसान ग्रस्त शेतकरी माय बाप सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत. हि वेगळी मदत सोडाच पण साधी इतर शेतकऱ्यांना मिळालेली हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदतही त्यांना मिळालेली नाही असे या दाम्पत्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT