farmer esakal
नाशिक

पावसाअभावी बळीराजा हवालदिल; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

बापूसाहेब वाघ

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : शेती मशागतीचे कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आज येईल, उद्या येईल असे करता करता पावसाची प्रतीक्षा करत होते. जून महिना पूर्ण संपत आला तरी पावसाअभावी शेतात पेरणीची कामे खोळंबली आहेत. (farmers-are-waiting-for-rains-for-sowing-nashik-agriculture-news)

वेळेवर पेरणी झाली तरच पुढील पिकांचे योग्य नियोजन

पावसाची जोरदार प्रतीक्षा शेतकरी वर्गाला होती. म्हणून पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत होते. परंतु, सोमवारी (ता. २८) दुपारी तीनच्या दरम्यान कुठे जास्त, तर कुठे कमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग पेरणी करावी की नाही या संभ्रमावस्थेत दिसून येत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जळगाव नेऊर येथे विशिष्ट भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला. उशिरा का होईना आलेल्या पेरणीयोग्य पावसामुळे किमान पेरणीचा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहे. वेळेवर पेरणी झाली तर पुढील पिकांचे योग्य नियोजन करता येते. जळगाव नेऊर येथील नाशिक - औरंगाबाद हायवेवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने पाणी हायवेवर येत असते.

(farmers-are-waiting-for-rains-for-sowing-nashik-agriculture-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT