Farmers cattle are being stolen in nitane village area nashik marathi news 
नाशिक

निताणे गावात शेळी चोरांचा उच्छाद; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष  

दीपक खैरनार

नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील निताणे गाव व परिसरात बोकड शेळी चोरांनी उच्छाद मांडला असून अनेक शेळ्या व बोकड अज्ञात चोरट्यांनी वाहनात डांबून चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गस्त घालावी व चोरट्यांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी पशुपालन करीत आहेत. मात्र या पशूंवर चोरट्यांनी नजर टाकली असून अनेक शेळ्या व बोकड छोट्या वाहनातून चोरल्याचे पंचायत समिती सदस्य वसंत पवार यांनी सांगितले. गावात व शेतात अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन केले आहे. रात्री व भरदिवसा छोट्या वाहनातून काही चोरटे फिरत आहेत. एकीकडे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने स्थानिक सातच्या आत घरात राहवे लागत आहे. पंचायत समिती सदस्य श्री. पवार यांच्याही मालकीच्या शेळ्यांवर चोरट्यांनी हात साफ केला असून बिबट्या आणि चोरट्यांनी या परिसरात उच्छाद मांडला आहे. पोलिसांनी गस्त घालून परिसरात होणा-या भुरट्या चो-यावंर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक खाद्यपदार्थांच्या FSSAI मोठी कारवाई, थेट विक्रीवर घातली बंदीच; १०० टक्के शुद्ध दाव्यावर घेतला आक्षेप

Nagpur Crime: लग्नाचे आमिष, प्रेमसंबंध अन् अत्याचार; एकास अटक; शहरातील चार ठाण्यांमध्‍ये गुन्हे दाखल

IPL 2027 : मुंबईचे चार खेळाडू Delhi Capitalsच्या निवड चाचणीसाठी दाखल झाले, यशस्वी जैस्वाल... ; सौरव गांगुली करणार निवड

Nagpur Civic Issue: साईनगरीत सात वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था; पहिल्याच पावसात वाहने अडकली चिखलात; वारंवार खोदकामामुळे रहिवासी त्रस्त

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात ट्विस्ट! निवृत्तीवेतनधारकांच्या ८ प्रमुख मागण्या; वेतन रचनेत होणार बदल?

SCROLL FOR NEXT