Late Sandeep Shevale esakal
नाशिक

Nashik : विहिरीत पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जायखेडा (जि. नाशिक) : येथील संदीप अर्जुन शेवाळे (वय ४२) या युवकाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) सकाळी जयपूर शिवारात घडली. (Farmers death by drowning after falling into well Nashik Latest Marathi News)

जयपूर शिवारातील सुनील खंडु ब्राह्मणकार यांचे शेत संदीपने वाट्याने घेतले होते. नेहमीप्रमाणे रविवारी तो शेतातील विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेला असता त्याचा अचानक पाय घसरल्याने तो विहिरित पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना समजताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याच शोध घेतला. मात्र, यश आले नाही.

विहिरीत ८० ते ९० फुटापर्यंत पाणी असल्यामुळे संदीपला शोधण्यात अडचणी येत होत्या. वाडीपिसोळ येथील कैलास सोनवणे, जायखेडा येथील बापू जगताप, लोहणेर येथील दिलीप अहिरे (पहिलवान) यांनी सात तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला. नामपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाख़ाली पोलिस हवालदार राजेश साळवे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT