hiraman-khoskar.jpg 
नाशिक

आमदार खोसकर म्हणताएत...'शेतकऱ्यांनो काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे!'

काळू राजोळे

नाशिक : (वाडीवऱ्हे) इगतपुरी तालुक्यात धरणे, रेल्वे, औद्योगिक वसाहत, रस्ते, समृद्धी महामार्ग आणि आता नवीन रेल्वेमार्ग या सर्व प्रकल्पांमुळे आधीच इगतपुरी तालुक्यातील जनता भूमिहीन झाली आहे, तरीही नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी शासन जमीन संपादन करीत आहे. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे नवीन रेल्वेमार्गासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

पाडळी देशमुख (ता. इगतपुरी) येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. त्यात, शेतकऱ्यांनी विरोधाचा इशारा दिला. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, बाळासाहेब कुकडे, कमलाकर नाठे, दशरथ मालुंजकर, भाऊसाहेब धोंगडे वरील सर्व गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात होते. आमदार खोसकर म्हणाले, की अनेक वर्षांपासून इगतपुरीमध्ये अनेक प्रकल्प झाले. त्यात धरण, रेल्वे, औद्योगिक वसाहत, रस्ते, समृद्धी महामार्ग आणि नवीन रेल्वे लाइनसाठी जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. 

इगतपुरी तालुक्यातील घोटी, माणिकखांब, मुंढेगाव , मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, नंदूरवैद्य, अस्वली ही सगळे गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याप्रश्‍नी ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तसेच दोन्ही खासदारांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वेमंत्री यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. मी शेतकऱ्यासोबत आहे, काळजी करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT