corona fighter 123.jpg
corona fighter 123.jpg 
नाशिक

#Coronafighter : "स्वत:च्या जीवाची पर्वा नाही..कोरोनाविरोधात लढणारा शूर शिपाई"

हर्षल गांगुर्डे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक / गणूर : पोटापुरती शेती, पावसाळ्यात अतिवृष्टी; पण उन्हाळा म्हटला, की पिण्याचे पाण्याचे हाल. शेतीवर पोटाची भूक मिटली नाही, की मग मिळेल ते काम करायचे. आर्थिक चणचण असताना पोराला शिकविले. आज तो डॉक्‍टर म्हणून कोरोनाविरोधात देशाचा शूर शिपाई म्हणून काम करतोय याचा अभिमान असून, त्याच्या कामाबद्दल लोकांकडून होणारे कौतुक ऐकले की केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान वाटते, हे शब्द आहेत डॉ. हेमराज यांचे वडील काशीनाथ दळवी यांचे. हेमराज सध्या नाशिकच्या कोरोना कक्षात "कोरोना फायटर्स' म्हणून यशस्वी काम करताहेत. 

प्रतिकुल परिस्थितीत केले मुलाला डॉक्टर
आई सिंधूबाई व वडील काशीनाथ यांचा हेमराज एकुलता मुलगा. दिंडोरी तालुक्‍यातील संगमनेर या आदिवासी गावातील जन्म. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या माय-बापाचे काबाडकष्ट बघत हेमराजने शिक्षणाच्या जोरावर परिस्थिती बदलायचे स्वप्न बघितले. प्राथमिक ते माध्यमिकपर्यंतचे शिक्षण दिंडोरी तालुक्‍यात, तर उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकच्या पंचवटी विद्यालयात झाले. वसतिगृहावर प्रतिमहिना मिळणारे 200 रुपये अन्‌ घरून मिळणाऱ्या मोजक्‍या पैशांवर हेमराज यांनी आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, तर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. केले. 

शेतकऱ्याच्या मुलाचा प्रवास अनेकांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा
2010 ला शासकीय वैद्यकीय सेवेत प्रवेश केला. शेकडो रुग्णांच्या सेवेबरोबर त्यांनी आरोग्यविषयक जनजागृती केली. कोरोनाच्या संकटाची चाहूल लागताच त्यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात नियुक्ती झाली असून, ते पूर्ण ताकदीने या संकटाविरोधात दोन हात करताहेत. एकेकाळी झोपडीवजा घर वाहून गेलेल्या आदिवासी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या मुलाचा प्रवास अनेक आदिवासी बांधवांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरतोय. या प्रवासात पत्नी हेमलता यांची मोलाची साथ मिळत आहे. 

आई-वडिलांच्या कष्टाचे चीज 
डॉ. हेमराज यांचा प्रवास जवळून बघितला आहे. अतिशय गरिबी व आदिवासी भागातून डॉक्‍टर होऊन त्याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केलंय. आज "कोरोना फायटर्स' म्हणून लढताना बघून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. - डॉ. हेमंत घांगळे, न्याय वैद्यकशास्रतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT