onion  esakal
नाशिक

नाशिक : कांदाचाळ दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

खंडु मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : एप्रिल महिन्याच्या सुरवातीला कांदा काढणी सुरु होते. कांदा काढणी झाल्यांनतर लगेचच शेतकरी उन्हाळ कांद्याची साठवणूक करतात. या वर्षी जानेवारीत कांदा लागवड सुरु झाल्याने सध्या शेतकरी वर्ग कांदाचाळ दुरुस्ती व डागडुजीच्या कामात गुंतला आहे. अनेक ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी इतर साधनांची तजवीज करण्यात कांदा उत्पादक गुंतला आहे.

उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी शेतकरी विविध प्रयोग करतो. त्यामुळे सध्या उन्हाळ कांदा काढणीपूर्वी कांदा साठवणूक करण्याची जागा, कांदाचाळ दुरुस्ती तसेच डागडुजी करण्याच्या कामात शेतकरी वर्ग गुंतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळ तयार करताना तारेच्या जाळीचा वापर केला असून, वेळू काठी, टोकर, कायरी या वनस्पतींचा वापर केला जात आहे. यामुळे कांद्याला हवा खेळती मिळते व कांदा चांगला टिकतो. कांदा साठवण्याच्या जागी अनेक शेतकरी सिमेंट कॉंक्रीट करून घेतात. तर काही शेतकरी या जागेवर वाळू टाकतात. कांदा सडल्यास त्यातून निघणारे खराब पाणी हे त्या जागेत मुरते व दुर्गंधी पसरत नाही. दरवर्षी शेतकरी कांदा काढणीपूर्वी हे काम करतात.

अनेक शेतकरी पक्क्या कांदा चाळीऐवजी उसापासून निघणाऱ्या पाचटापासून कांदा चाळ तयार करतात. यामुळे तापमान नियंत्रणात राहून कांदा अधिक काळ टिकतो. त्यामुळे या पाचटाच्या चाळीवर कांदा साठवणुकीपूर्वी शेतकरी प्लॅस्टिक आवरण टाकून सध्या अशी कामे करण्यात गुंतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT