farmer worried esakal
नाशिक

कोवीड सोबत दुष्काळाचीही चाहुल? बळीराजा हवालदील

संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्याप पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. सातत्याने अर्वषणाचा शाप भाळी लाभलेल्या तालुक्यात दोन वर्षांत परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले. दीड वर्षांपासून कोविडच्या छायेत असलेल्या तालुक्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थिती उद्भवते की काय, या साशंकतेने भर टाकली आहे.(Farmers-worried-Drought-with-covid-nashik-marathi-news)

पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थिती उद्भवते की काय?

नांदगाव तालुक्यात मका, कपाशी, बाजरी, भुईमूग, तेलबिया, कडधान्य आदी पिकांना प्राधान्य दिले जाते. जूनचे २१ दिवस संपले तरी २०२१ मधील खरीप हंगामात पावसाचा अजून थेंब नाही. राज्यात इतरत्र पाऊस कोसळत आहे. पण, नांदगाव तालुका यास अपवाद आहे. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यात पाऊस झाला की नाही झाला तरी पिकांची नासाडी होत असते. २००९ मध्ये तालुक्यात महापूर आला होता. त्यानंतर दोन वर्षे बरी गेली. त्यानंतर पुन्हा पाऊस नसल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागले. २०१९-२० मध्ये तर परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाली. २०२१ च्या खरीप हंगामात जूनमध्ये वादळाने थैमान घालत उन्हाळी भाजीपाला, फळांची पडझड झाली. त्यात आंबा, केळी, पेरू, लिंबू, जांभूळ आदी फळांना सपाटून मार बसला. फळे जमिनीवर पडून मातीमोल झाली.

पेरण्या खोळंबल्या

जूनमधील मृग नक्षत्र गेले तरी शेतकऱ्यांनी पेरणीची पांभर पुजली नाही. आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. महागडी खते, बियाणे खरेदी करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाऊस पडेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. बोलठाण, जातेगावच्या घाटमाथ्यावर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सहा गावांमध्ये पेरणी झाल्याचे चित्र आहे. तर तालुक्यात इतरत्र पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT