Accident News Esakal
नाशिक

Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी

भरधाव ट्रेलरने काळी पिवळीला उडवलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाणे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. थरकाप उडवणारी ही घटना आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास काळी पिवळी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे ६० फूट दूर फेकली गेली.

या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बघा, गद्दार चालले! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या केंद्रीय मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचलं; मंत्री म्हणाले, हे देशाचे शत्रू

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने दिली धडक, पुण्यात सीएनजी पंपासमोरील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाला परवानगी दे, असं सांगितलं अन् तीन मुलींसह पत्नीला घराबाहेर काढलं, धक्कादायक कारण समोर

Jayant Patil : वाळवा तालुक्यात सत्तासंघर्ष तीव्र! जयंत पाटीलांची भिंगरी, महायुतीचा बालेकिल्ला ढवळून निघाला

Photos : ओसाड जमिनीत सापडला १००० वर्ष जुना सांगाडा; 'समाधी' मुद्रा पाहून जगभर सगळेच आश्चर्यचकित, पाहा व्हायरल फोटो

SCROLL FOR NEXT