A sand transport truck overturned and an Ertiga car was crushed in a horrific accident near Turki Hudi on Deola Road. esakal
नाशिक

Nashik Accident : सटाणा-देवळा रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक, कारच्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident : देवळा रस्त्यावरील तुर्की हुडीजवळ सोमवारी (ता.५) सकाळी सहाला वाळूने भरलेला ट्रक व इर्टिगा कारची समोरासमोर जोरात धडक झाल्याने झालेल्या अपघातात चालकासह दोघा तरुणांचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत.

अपघातात इर्टिगा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fatal accident on Satana Devla road Two youths died in collision between truck car Nashik news)

सटाणा शहरातील पिंपळेश्वर भागात वास्तव्यास असलेले योगेश केदा जाधव (वय २०) हा आराई (ता.बागलाण) येथील मित्र प्रवीण राजेंद्र गांगुर्डे यांची कार (एमएच १८ बीसी ५८९३) घेऊन नातेवाइकांसह दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दर्शनाला गेले होते.

सोमवारी सकाळी सहाला योगेश कुटुंबीयांसह सटाणा शहराकडे परतत असताना सटाणा शहराकडून देवळ्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक (एमएच १८ बीएच ५१३५) ने तुर्की हुडी परिसरात कारला समोरून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात वाळूने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला तर कारचा पूर्ण चक्काचुर झाला. अपघातात चालक योगेश (दादू) केदा जाधव, ललित पांडुरंग जाधव (रा.सटाणा वय ४२) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मोठा रक्तस्राव झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर कारमधील सिंधूबाई रोहीदास पवार (वय ६०), पूजा नरेंद्र सोनवणे (वय २४), नरेंद्र अभिमन सोनवणे (वय ३०) या पती पत्नीसह स्वामी ललित जाधव ( वय ८), साक्षी नंदकिशोर सोनवणे (वय १६) हे गंभीर जखमी झाले.

अपघातामुळे जोरात आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी घाव घेऊन सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने कारचालक योगेश जाधव व ललित जाधव या दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिघा गंभीर जखमींवर सटाणा येथील एका खासगी रूग्णालयात तर आठ वर्षीय स्वामी जाधव व सिंधूबाई पवार या दोघांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील अधिक तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT