Nashik Crime News 
नाशिक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजीवन कारावास

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार बलात्कार करुन गरोदर केल्याच्या आरोपात नराधाम बाप श्रावण लहानू गायकवाड (वय ३४, रा. पिंपळगाव निपाणी, ता. निफाड) यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (father who abused his minor stepdaughter was sentenced to life imprisonment)

आरोपी श्रावण गायकवाड हा सावत्र मुलीला शेतात गवत आणण्यासाठी घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी देत सतत लैंगिक अत्याचार करत होता. पिडीत मुलीला त्रास जाणवू लागल्याने आईने डॉक्टरांकडे नेल्यावर पिडीत मुलगी गरोदर राहिल्याचे निदर्शनास आले. पिडीतेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी पिडीतेने सावत्र बापाने केलेले कृत्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

नराधाम पित्यास अटक करण्यात आली. तपासादरम्यान पिडीत‌ मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधाम पित्याचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पिडीतेसह आईचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आले. आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पोलिस निरिक्षक अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे, डीएनए अहवाल तपासणीस डॉ. वैशाली महाजन यांच्यासह सोळा जणांची साक्ष नोंदविली. या खटल्यात पोलिस‌ हवालदार संदीप डगळे, संतोष वाकळे यांनी सहकार्य केले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षपुराव्यावरुन आरोपी पित्याने सोळा वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT