Pratiksha Suryavanshi while preparing the skill of the vehicle. esakal
नाशिक

Father Daughter Bond :...छोरीयां छोरों से कम हैं कें; कुशन कामात वडीलांना लेकीचा हातभार!

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : वडीलांच्या छोट्यामोठ्या व्यवसायात मुले ज्याप्रमाणे मदतीचा हात देतात. मात्र या सर्वांमध्ये मुली देखील कमी नसल्याचे सारदे (ता. बागलाण) येथील पुंजाराम सूर्यवंशी यांच्या लेक प्रतिक्षा हिने दाखवून देत मुलीही प्रत्येक कामात कुशल असल्याचे दाखवीत एक आदर्श निर्माण केला आहे. प्रतिक्षा ही वडिलांना वाहनातील विविध प्रकारे कुशन तयार करण्यासाठी हातभार लावत असते. (Father Daughter Bond Daughter help contribution to father in cushion work nashik news)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

सारदे (ता.बागलाण) येथील पुंजाराम सूर्यवंशी पूर्वीपासून वाहनांना कुशन तयार करण्याचे काम करतात. या कुशन कामातून घराचा गाडा तसेच मुलांचे शिक्षण करीत आहेत. प्रतिक्षा (बाली) सूर्यवंशी ही लहानपणापासून वडील पुंजाराम हे कुशन काम करीत असताना लक्ष घालून होती.

पाचवीत असतानाच प्रतिक्षाने कुशन कामात आपले कौशल्य सिद्ध करीत वडीलांना हातभार लावू लागली. त्यानंतर नामपूर येथील मालेगाव रस्त्यावरील गाळ्यात वाहनातील कुशन तयार करण्यासाठी बाप-लेकीने व्यवसाय सुरू केला.

प्रतिक्षाने कुशन कारागीरीसह शिक्षण सुरूच ठेवले असून आज महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. श्री. पुंजाराम हे व्यवसायात लेकींच्या मदतीने संपूर्ण पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त केले.

"वडीलांच्या व्यवसायात मदत करीत प्रतिक्षाने मुलांप्रमाणेच मुलीही प्रत्येक कामात कुशल असल्याचे दाखवत मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे."- योगेश जगताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT