Krushna Vishwakarma
Krushna Vishwakarma esakal
नाशिक

Nashik News : शेवटी बापाचं काळीज ते...स्वतः आगीत होरपळत मुलांचा वाचवला जीव

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : रात्री च्या सुमारास गॅरेज मध्ये काम करत असताना अचानक लाईट गेल्याने मेणबत्ती पेटवून तिच्या प्रकाशात काम करत असताना मेणबत्ती खाली पडल्यानंतर जवळच असलेल्या थीनरने पेट घेतल्याने गॅरेज मालकाचा मृत्यू झाल्याची घटना अंबड परिसरात घडली आहे. (father saves lives of children by burning himself in fire at cidco Nashik News)

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १ फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कृष्णा राजकुमार विश्वकर्मा (वय-२९, रा. इंडोलाईन कंपनी च्या मागे, अंबड, नाशिक) हे त्यांच्या घराजवळील त्यांच्याच स्वतःचे वा.सु. विश्वकर्मा मोटर्स ह्या गॅरेज मध्ये काम करत असताना लाईट गेल्यामुळे गॅरेज मध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू असताना मेणबत्ती खाली पडल्याने खाली असलेल्या थिनरने पेट घेतला यात कृष्णा विश्वकर्मा हे मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले होते.

प्रसंगी त्यांचे दोघे मुलं देखिल यावेळी गॅरेज मध्येच होते. वडिलांच्या कपड्यांनी घेतलेला पेट लक्षात घेऊन त्यांनी वडिलांजवळ जाण्यासाठी सुरुवात केली.

परंतु बापाचे काळीज ते, इतक्या भीषण प्रसंगी सुद्धा दोघे चिमुकले आपल्या जवळ आहे तर त्यांना देखिल दुखापत होईल म्हणून कृष्णा विश्वकर्मा यांनी दोघ मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत स्वतःच आग विझावण्याचा प्रयत्न करू लागले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विझवत पुढिल उपचारासाठी त्याचा भाऊ पिंटु राजकुमार विश्वकर्मा याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालावली आहे.

याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युंची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT