father son murder in quarrel nashik marathi newsfather son murder in quarrel nashik marathi news 
नाशिक

किरकोळ वादाने घेतले भयानक वळण! पिता-पुत्राच्या खुनाने शहरात खळबळ

दीपक अहिरे

नाशिक / पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिका नगर परिसरात  दोन कुटूंबामध्ये किरकोळ वाद झाला होता. पण या वादाने पुढे भयानक वळण घेतले आहे. घडलेल्या प्रकारानंतर संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

काय घडला प्रकार?

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शहरातील अंबिका नगर परिसरात मंगळवारी(ता.1) दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल कुटुंबातील सदस्यांत वादंग झाले. त्यातील धाडीवाल कुटुंबातील दोन युवकांकडून शिंदे कुटुंबातील दोघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (वय 67) व माणिक पुंडलिक शिंदे (वय 40) रा.अंबिका नगर हे दोघे गंभीर झाले. आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी मृत्यू झाल्याने शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

शिंदे व धाडीवाल कुटुंबातील सदस्यांत झाला वाद

घराजवळ बसण्यावरून झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ल्यात वडिल आणि मुलगा दोघे गंभीर जखमी झाले होते. पण त्यांनंतर उपाचार सुरु असताना मात्र गुरुवारी त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. या  निर्घृण हत्येनंतर शहरात खळबळ उडाली असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना गजाआड करण्यात आले आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

मृतांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विकी दत्तात्रय धाडीवाल, वय 27, व अजय प्रकाश धाडीवाल वय 19 रा.आंबिका नगर पिंपळगाव बसवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत गजाआड करण्यात आले आहे.शिंदे बापलेकाच्या हत्तेनंतर अंबिका नगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज सैनदाने करत आहे.

संपादन- ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT