Father won Ideal Teacher Award Daughter won Gold medal in Scholarship exam Nashik News  esakal
नाशिक

पित्याला आदर्श शिक्षक पुरस्कार; लेकीला शिष्यवृत्तीत गोल्ड मेडल

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील चांदोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (ZP primary school) कार्यरत असलेले उपशिक्षक अविनाश गुलाबराव खैरनार यांची नुकतीच राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार : २०२२ (State Level Service Honors Ideal Teacher Award) साठी निवड करण्यात आली. त्यानंतर कन्या वेदिकालाही राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत (State Level Scholarship Examination) गोल्ड मेडल (Gold Medal) मिळाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.

अविनाश खैरनार यांची निवड सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य तथा ऑनलाइन पीडीएफ (Online PDF) निर्मिती यात विशेष कार्य केल्याबद्दल करण्यात आली आहे. हा सन्मान कुणाच्याही शिफारशीशिवाय, कुठलीही फी न आकारता महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या सर्व शिक्षकांकडून स्वतः खर्च करून देण्यात येतो. ही निवड नाशिक जिल्हा निवड समिती सदस्य गिरीष दारुंटे यांनी जाहीर केली. अविनाश खैरनार यांची मोठी कन्या वेदिका हिने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप राज्यस्तरीय परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून गोल्ड मेडल संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. बाप- लेकीच्या या विशेष कामगिरीचे चांदोरे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक, स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT