fb esakal
नाशिक

FB रिक्वेस्ट स्विकारणे पडले महागात; तरुणाला ब्लॅकमेल करत पैशाची मागणी

विनोद बेदरकर

नाशिक : सोशल मीडियावर (Social media) पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका प्रकरणात फेसबुकवरील तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे एकाला चांगलेच महागात पडले. फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर तरुणाला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी सुरू झाल्याने तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठत आपबिती सांगितली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने व्हिडीओ कॉल केला अन्....

सोशल मीडियावर अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), व्हाट्स ॲपवरून (whats app) पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार नाशिकच्या तरुणासोबत घडला आहे. फिर्यादी पुरुषाचे फेसबुकवर खाते आहे. ६ मार्चला त्यांना पूनम शर्मा नावाच्या महिलेची रिक्वेस्ट आली. फिर्यादी तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्याच्या दोन दिवसांनंतर या तरुणीने तरुणाचा व्हॉटस ॲप नंबर घेत त्यावर व्हिडिओ कॉल केला. मात्र, सदर व्हिडिओ कॉलमध्ये एक महिला विवस्त्र अवस्थेत बसून अश्लील हावभाव करत होती. या वेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येत होता. सदर तरुणास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची व फेसबुकवरील मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच, सदर व्हिडिओ इतरत्र न पाठविण्याची धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT