onion seed.jpg 
नाशिक

डोळ्यात तेल घालून कांद्याची राखण! वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती 

विजय पाटील

गिलाणे ( जि. नाशिक) : एकीकडे कांद्याचे बाजारभाव वाढल्याने खुशीत असलेल्या शेतकऱ्यांना बोचरी थंडी अंगावर झेलत रात्रभर कांद्याची राखण करावी लागत आहे. कसमादे पट्ट्यात कांदाचोरीच्या घटना वाढल्या असून, शिल्लक कांदा सांभाळून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी चाळीजवळच डेरा टाकला आहे. डोळ्यांत तेल घालून कांद्याची राखण केली जात आहे. 

५० टक्के कांदा सडल्याने भाव वाढले

कांद्याला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात शंभरीच्या आसपास कांदा विकला जात असून, हे दर अजून वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे कांद्याला सोन्याचा भाव आला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे ५० टक्के कांदा सडल्याने भाव वाढल्याचे बोलले जात आहे. कांद्याचे भाव वाढल्याने कांदाचोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात आजूबाजूला असलेल्या चाळीतील कांदा रात्रीच्या वेळी चोरून नेणे चोरट्यांना सहज शक्य होते. त्यामुळे कांदा उत्पादक बळीराजा धास्तावला आहे. कसमादे पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचा कांदा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी खोडसाळपणे कांदाचाळीत यूरिया टाकून कांदा खराब करण्याचे गैरकृत्य काही समाजकंटक करताना दिसत आहेत. 

कांद्याची राखण करण्याची वेळ

मुळातच सध्या खूपच थोडा कांदा शिल्लक असून, शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री चाळीमध्ये साठविलेल्या कांद्याची राखण करण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चाळीमध्ये कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; परंतु चाळीमध्ये असलेला कांदा चोरी होतो की काय याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT